आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • For The First Time In The Corona Period, GST Collection Has Crossed Rs 1 Lakh Crore

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अर्थव्यवस्था रुळावर येण्यास सुरुवात:कोरोना काळात पहिल्यांदाच GST कलेक्शन 1 लाख कोटींच्या पुढे

नवी दिल्लीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

कोविड-19 मुळे संकटात सापडलेली भारतीय अर्थव्यवस्था हळु-हळू पुर्ववत होत आहे. अर्थव्यवस्था पटरीवर येत असल्याचे संकेत गुड्स अँड सर्विसेज टॅक्स (GST) कलेक्शनमधून मिळाले आहे. अर्थ मंत्रालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार, ऑक्टोबरमध्ये जीएसटी कलेक्शन 1.05 लाख कोटींपेक्षा जास्त झाले आहे. फेब्रुवारीनंतर म्हणजेच कोरोना लॉकडाउन काळात पहिल्यांदाच जीएसटी कलेक्शनने 1 लाख कोटींचा आकडा पार केला आहे.

80 लाख GSTR-3B रिटर्न फाइल झाले

अर्थ मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, 31 ऑक्टोबर 2020 पर्यंत 80 लाख GSTR-3B रिटर्न फाइल झाले. यामुळे ऑक्टोबर-2020 ग्रॉस जीएसटी रेव्हेन्यू 1,05,155 कोटी रुपयांवर आला. यात 19,193 कोटी रुपयांचा सीजीएसटी, 5,411 कोटी रुपयांचा एसजीएसटी आणि 52,540 कोटी रुपयांचा आयजीएसटी सामील आहे. तसेच, आयजीएसटीमधून आयात केलेल्या सामानाद्वारे आलेले 23,375 कोटींचाही यात समावेश आहे.

मागच्या वर्षीपेक्षा 10% जास्त रेव्हेन्यू

अर्थ मंत्रालयाकडून सांगण्यात आले की, ऑक्टोबर 2020 मध्ये जीएसटी कलेक्शन मागच्या वर्षीपेक्षा 10% जास्त झाले आहे. मागच्या वर्षी ऑक्टोबर 2019 मध्ये जीएसटी कलेक्शन 95,379 कोटी रुपये होते.

कॅलेंडर ईअर 2020 मध्ये जीएसटी कलेक्शन

महिनाकलेक्शन (कोटी रु. मध्ये)
जानेवारी1,10,828
फेब्रुवारी1,05,366
मार्च97,597
एप्रिल31,294
मे62,009
जून90,917
जुलै87,422
ऑगस्ट86,449
सप्टेंबर95,480
ऑक्टोबर1,05,155