आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • For The First Time In The Country, A Satellite Made By Girls Will Take A Leap Into Space, Tomorrow Will Be Launched By The Rocket 'SSLV'

उपग्रह अवकाशात:देशात प्रथमच मुलींकडून निर्मित उपग्रह अवकाशात घेणार झेप, उद्या ‘एसएसएलव्ही’ या रॉकेटद्वारे प्रक्षेपण

अनिरुद्ध शर्मा | नवी दिल्ली7 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • हा उपग्रह 75 शाळांतील 750 विद्यार्थिनींनी केला तयार -जमिनीचे मॅपिंग करणार अन् अंतराळात तिरंगा फडकवणार

शालेय विद्यार्थिनींनी तयार केलेला ‘आझादीसॅट’ हा उपग्रह रविवारी सकाळी ९ वाजून १८ मिनिटांनी अवकाशात झेप घेणार आहे. त्याच्या उड्डाणाआधीच्या चाचण्या सुरू झाल्या आहेत. श्रीहरिकोटात उलटगणती सुरू झाली आहे. देशातील ७५ शाळांतील ७५० विद्यार्थिनींनी हा उपग्रह तयार केला असून, त्याचे थेट प्रक्षेपण पाहण्यासाठी त्या श्रीहरिकोटा येथे पोहोचत आहेत. फक्त मुलींनीच हा उपग्रह तयार केल्याने हा दिवस ऐतिहासिक असेल. विशेष म्हणजे स्मॉल सॅटेलाइट लाँच व्हेइकल (एसएसएलव्ही) प्रथमच फक्त ८ किलोचा उपग्रह अंतराळाच्या कक्षेत स्थापित करेल. तो अवकाशातून जमिनीचे मॅपिंग करेल. तसेच अंतराळात तिरंगा फडकावेल.

एसएसएलव्हीची वैशिष्ट्ये
हे रॉकेट ६ लोक फक्त ७२ तासांत असेम्बल करू शकतात

एसएसएलव्ही खूप किफायती आहे. तो लाँच-ऑन-डिमांड संकल्पनेवर तयार केला आहे. पीएसएलव्ही किंवा जीएसएलव्ही तयार करण्यास ६० ते ९० दिवस लागतात आणि त्यासाठी ६०० लोकांची गरज भासते. याउलट फक्त ६ लोक ७२ तासांत एसएसएलव्ही असेम्बल करू शकतात. त्याच्यामार्फत ५०० किलोचा उपग्रह ५०० किमी दूर लो अर्थ ऑर्बिटमध्ये पाठवता येऊ शकतो. पीएसएलव्हीमार्फत १,७५० किलो वजन पाठवता येऊ शकते.

या शहरांतील विद्यार्थिनींनी तयार केला उपग्रह : भोपाळ, जयपूर, दिल्ली, चेन्नई, हैदराबाद, सिकंदराबाद, बाजरिया, लोणावळा, अंबाला, पानिपत, बटाला, अमृतसर, आग्रा, मथुरा, वृंदावन, कलिमपाँग, गंगटोक, अंदमान, कवर्धा, महासमुंद आदी.

बातम्या आणखी आहेत...