आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजम्मू-काश्मीर ऑनलाइन सेवांसाठी पीएसजीए ऑटो-अपील सुरू केेले आहे. असे करणारे ते देशातील पहिले राज्य आहे. जम्मू-काश्मीरचे मुख्य सचिव ए.के.मेहता यांनी लाेक सेवा हमी अधिनियम(पीएसजीए) ऑटो-अपील सुविधेचा शुभांरभ केला. त्यांनी सांगितले की, ऑटो-अपील फीचरला सर्व्हिस प्लस प्लॅटफॉर्मवर एकिकृत करणे क्रांतीकारक पाऊल आहे.
हे जनतेसाठी सेवांमध्ये पारदर्शकता आणि उत्तरदायित्व कायम राखण्यात एक महत्त्वाच्या मोडच्या रूपात काम करेल. लोक सेवा हमी अधिनियम २०१० मध्ये पारीत झाला. हा नागरिकांना सार्वजनिक सेवांचा कायदेशीर अधिकार देते. यात आवश्यक प्रक्रिया आणि कालमर्यादेचे पालन न करणाऱ्या अधिकाऱ्यांविरुद्ध निर्बंधाची तरतूद आहे. सरकारच्या काही ऑनलाइन सेवांना पीएसजीए ऑटो अपील सुविधेने जोडल्याने लोकांना फायदा होईल.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.