आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोरोना कहर:देशात प्रथमच एक दिवसात 1 लाखावर रुग्ण, संसर्गाचा आधीचा ‘पीक’ पडला मागे, आता संसर्गाची गती आणखी वाढली

नवी दिल्लीएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • एक महिन्यापूर्वी 504 दिवसांत दुप्पट होणारे रुग्ण आता 100 दिवसांतच दुप्पट

देशात रविवारी १.०३ लाख रुग्ण आढळले. ही संख्या १४ महिन्यांच्या कोरोना काळात सर्वाधिक आहे. आतापर्यंत अमेरिका-ब्राझीलमध्ये अधिक रुग्ण आढळत होते. शनिवारी अमेरिका-ब्राझीलच्या एकत्रित रुग्णांपेक्षाही जास्त रुग्ण भारतात आढळले आहेत. 57 हजार नवे रुग्ण रविवारी महाराष्ट्रात आढळले. यातील ११ हजार एकट्या मुंबईत. इतर राज्यांबाबत विचार करता एकूण २३ राज्यांत कोरोनाची दुसरी लाट सुरू झाली आहे.

एक महिन्यापूर्वी ५०४ दिवसांत दुप्पट होणारे रुग्ण आता १०० दिवसांतच दुप्पट
भारत कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत सापडला आहे. रुग्णवाढीचा वेग पाहता चित्र अजूनच भीतिदायक आहे. एक महिन्यापूर्वी देशात रोज आढळणाऱ्या रुग्णांची सरासरी १५,६०० होती, ती आता एक लाख होत आहे. रुग्णवाढीचा वेग पाहता येत्या १०० दिवसांत देशातील एकूण रुग्णांची संख्या दुप्पट (अडीच कोटी) होऊ शकते, एक महिन्यापूर्वी ५०४ दिवसांत रुग्णसंख्या दुप्पट होत होती. चिंतेची बाब म्हणजे उपचार घेणाऱ्या रुग्णांची (अॅक्टिव्ह केस) संख्या सव्वासात लाखांच्या पुढे गेली आहे. फेब्रुवारीत ती दीड लाखापेक्षा कमी होती. आता भारतात रोज सर्वाधिक रुग्ण आढळत आहेत. यापूर्वी अशी स्थिती सप्टेंबर २०२० मध्ये होती.

महाराष्ट्र, कर्नाटक, पंजाब, छत्तीसगड, मध्य प्रदेश, राजस्थान आणि पंजाबमध्ये रोज आढळणारे रुग्ण दर १०-१२ दिवसांत दुप्पट होत आहेत. फक्त केरळमध्ये रुग्ण घटत आहेत.

बातम्या आणखी आहेत...