आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

रेल्वे:देशात प्रथमच सौरऊर्जेवर चालणार रेल्वे, मप्रतील बीनामध्ये 1.7 मेगावॅटचा सौरऊर्जा प्रकल्प लावण्याचे काम पूर्ण

नवी दिल्ली/बीनाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • पहिल्यांदा देशात सौरऊर्जेचा वापर करत रेल्वे चालवली जाईल

सौरऊर्जेतून देशातील अनेक रेल्वे स्थानकांवरील विजेची गरज पूर्ण केल्यानंतर रेल्वे लवकरच या विजेचा वापर रेल्वे गाडी चालवण्यासाठी करणार आहे. मध्य प्रदेशातील बीना येथे रेल्वेने आपल्या मोकळ्या जमिनीवर १.७ मेगावॅटचा सौरऊर्जा प्रकल्प उभारण्याचे काम पूर्ण केले आहे. त्याला २५ केव्हीची ओव्हरहेड लाइनने जोडून रेल्वे चालवण्याची योजना आहे. पहिल्यांदा देशात सौरऊर्जेचा वापर करत रेल्वे चालवली जाईल.

रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले की, भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लि. (भेल) आणि भारतीय रेल्वे यांच्या संयुक्त उपक्रमातून उभारण्यात आलेल्या या प्रकल्पाच्या चाचणीचे काम सुरू झाले आहे.

पुढील १५ दिवसांत वीज उत्पादन सुरू होईल. प्रकल्पात डीसी प्रवाह एक फेज असलेल्या एसी प्रवाहात बदलण्यासाठी विशेष तंत्राचा वापर करण्यात आला आहे. यातून सरळ ओव्हरहेड लाइनला पुरवठा होईल. प्रकल्पाची वार्षिक उत्पादन क्षमता २५ लाख युनिट असेल. यामुळे १.३७ कोटी रुपयांची बचत होईल. रेल्वे छत्तीसगडमधील भिलाईतही आपल्या मोकळ्या जमिनीवर ५० मेगावॅटचा सौरऊर्जा प्रकल्प उभारत आहे. त्यालाही केंद्राच्या ‘ट्रान्समिशन यूटिलिटी’शी जोडले जाईल. येथे मार्च २०२१ पर्यंत उत्पादन सुरू होण्याची आशा आहे. हरियाणातील दिवाना येथे दोन मेगावॅटच्या सौरऊर्जा प्रकल्पात यावर्षी ३१ ऑगस्टपासून उत्पादन सुरू होण्याची अपेक्षा आहे.

0