आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • For The First Time In The History Of Kolkata, Women Priests For Public Durga Puja

मंडे पॉझिटिव्ह:कोलकात्याच्या इतिहासात प्रथमच सार्वजनिक दुर्गा पूजेसाठी महिला पुजारी; त्यांच्या पूजेत श्लोक, मंत्रांसोबत रवींद्र संगीत, द्विजेंद्रगीतही

कोलकाता / सोमा नंदी16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
डावीकडून...पॉलोमी, सेमांती, नंदिनी - Divya Marathi
डावीकडून...पॉलोमी, सेमांती, नंदिनी
  • साऊथ कोलकाता क्लबने यंदा पूजेची थीम ‘दुर्गामातेची पूजा मातांद्वारे’ अशी ठेवली

या नवरात्रीला कोलकात्यात एक नवा आदर्श प्रस्थापित होणार आहे. इतिहासात प्रथमच सार्वजनिक दुर्गापूजा चार महिला पुजारी करणार आहेत. दुर्गापूजेनिमित्त नवनवीन उपक्रम करण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या साऊथ कोलकाता क्लबने हा निर्णय घेतला आहे.

क्लबमध्ये पूजा करणाऱ्या ६६ पल्ली पूजा समितीचे प्रद्युम्न मुखर्जी यांनी सांगितले की, खुंटी पूजेपासून (पंडाल बनवण्याची सुरुवातीची पूजा) विजयादशमीपर्यंतची पूजा एखाद्या महिला पुजाऱ्याने यापूर्वी कधीही केलेली नाही. पण आमच्या क्लबमध्ये चार महिलांची ही टीम नवी परंपरा सुरू करेल. त्यांची पूजा करण्याची स्वतंत्र शैली आहे. पूजेच्या मंत्रांसोबत रवींद्र संगीत, रजनीकांता, द्विजेंद्रगीत यांसारख्या विविध शैलींची गाणी विशेष आकर्षण असतील. डॉ. नंदिनी भौमिक, रूमा रॉय, सेमांती बॅनर्जी आणि पॉलोमी चक्रवर्ती एक दशकापासून शहरात लग्न, गृहप्रवेश अशा महत्त्वाच्या समारंभात पुरोहित म्हणून काम करत आहेत, पण पुजारी म्हणून त्या प्रथमच मूर्तीपूजा करतील. मुखर्जी म्हणाले की, लोक हा बदल स्वीकारतील अशी आमची अपेक्षा आहे. त्यामुळे यंदा पूजेची थीम ‘दुर्गामातेची पूजा मातांद्वारे’ अशी ठेवण्यात आली आहे.

नंदिनी यांनी सांगितले की, आजकाल लोक पूजाविधींमध्ये आवडीने सहभागी होण्याऐवजी इतर गोष्टींमध्येच सहभागी होतात. असे लोक पूजाकार्यात आवडीने सहभागी होतील हे पाहणे हे आमचे प्रमुख उद्दिष्ट आहे.

त्यांच्या संघर्षावर चित्रपटही : नंदिनी यांचे जीवन आणि कार्य यापासून प्रेरणा घेऊन ‘ब्रह्मा जानेन गोपोन कोम्मोटी’ (ब्रह्माच जाणे, गोपनीय काम कोणते) हा चित्रपटही तयार झाला आहे. मुख्य पात्राचे लग्न संकुचित मानसिकता असलेल्या कुटुंबात होते. तेथे पूजापाठ आणि धार्मिक प्रथांमध्ये महिलांच्या विचारांना महत्त्व दिले जात नव्हते. ही आव्हाने दूर करण्याच्या संघर्षावरच चित्रपटाचे कथानक आहे.

बातम्या आणखी आहेत...