आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
तीन दशकात प्रथमच काश्मिरातील सर्व १० जिल्हे पर्यटकांसाठी खुले केले जात आहेत. पूर्वी पर्यटक श्रीनगर, बडगाम, बारामुला, अनंतनागपर्यंतच जात असत. एकेकाळी दहशतवादी कारवायांची केंद्र ठरलेले दक्षिण काश्मीरही आता पर्यटकांनी गजबजून जाईल. कुपवाडातील तंगधार, बंगस, बांदीपोराचे गुरेज, पुलवामाचे शिकारगाहसारखी पर्यटनस्थळे पर्यटकांच्या स्वागतासाठी सज्ज आहेत. मे महिन्यापर्यंत राज्यातील जवळपास सर्व पर्यटनस्थळे खुली होतील. अनेक अज्ञात व सुरक्षित भागही खुले केले जात आहेत. दुसरीकडे या हंगामात आतापर्यंत एक लाखाहून अधिक पर्यटकांनी काश्मीरला भेट दिली आहे. गुलमर्गसारख्या हिल स्टेशनचे १००% हॉटेल बुक आहेत. श्रीनगरमध्येही ३०-४०% हॉटेल अगोदरच बुक आहेत. श्रीनगर विमानतळावरून रोज ४५ विमानांची ये-जा सुरू आहे. पर्वूी ही संख्या १०-१५ होती. अनेक मार्गांवर एक आठवड्यापर्यंत सीट नाहीत. अहमदाबाद, बंगळुरूसारख्या शहरांतून प्रथमच थेट सेवा सुरू झाली आहे.
ही नवीन पर्यटनस्थळे खुली होण्याची आशा
तंगधार : हा डोंगराळ भाग कुपवाडा जिल्ह्यात नियंत्रण रेषेवर आहे. तीन बाजूने पाक अधिकृत काश्मीरने वेढला आहे. किशनगंगा नदी त्यातून वाहते.
गुरेज : हे खोरे बांदीपोर जिल्ह्यात नियंत्रण रेषेवर आहे. प्राचीन चीनी रेशम मार्गावरील एका दुर्गम रस्त्यावर हे खोरे आहे. येथे प्राचीन पुरातत्व स्थळ आहे. शारदा विविचे अवशेष आहेत. त्याला ट्रेकर्सचे स्वर्ग म्हटले जाते.
बंगस : कुपवाडा जिल्ह्यातील हे खोरे विशाल डोंगर, नद्या व जंगलाने वेढलेले आहे. हे गुलमर्ग व पहलगामपेक्षाही सुंदर आहे.
शिकारगाह : पुलवामा जिल्ह्यातील त्राल भागातील हे वन्यप्राण्यांचे घरही आहे. ते दाट जंगलाचा मोठा भाग आहे. त्याला पारंपरिक पद्धतीने महाराजांचे आवडते शिकारीचे ठिकाण समजले जायचे.
दुधपथरी खोरे : दुधपात्रीचा अर्थ आहे ‘दुधाचे खोरे’ आणि याचे कारण आहे गवताच्या विशाल मैदानातून वाहणारे पाणी लांबून दुधासारखे दिसते. प्रत्येक ठिकाणी बर्फाच्छादित डोंगर व देवदारचे जंगल आहे.
डकसम अनंतनाग : अनंतनागपासून सुमारे ४० किमी आग्नेयला आहे. ट्रेकर्ससाठी स्वर्ग आहे. गवताच्या मैदानासह ब्रिंगी नदी या जागेचे सौंदर्य वाढवते.
कर्नाह : एलओसीसह कुपवाड्यात कर्नाह चारही बाजूने डोंगराने वेढले आहे. ही हेली स्कीइंग, स्नो स्कीइंग, रॉक क्लायम्बिंग व साहसी पर्यटनासाठी आदर्श जागा आहे.
लोलाब : आधीच्या काळात याला काश्मीरचे प्रवेश द्वार म्हटले जायचे.
सात ट्रेकिंग मार्गांना मंजुरी, १ मेपासून वन विभागाचे विश्रामगृहही बुक करता येतील
या प्रदेशात स्थानिक प्रशासनाने ७ नव्या ट्रेकिंग मार्गांना मंजुरी देऊन आता पर्यटकांचा उत्साह अधिक वाढवला आहे. हे मार्ग आतापर्यंत पर्यटकांसाठी बंद होते. पर्यावरण व वन्यप्राण्यांबद्दल आवड असणारे पर्यटक वन व पर्यटन विभागाची विश्रामगृहे व निरीक्षणगृहांत आता बिनधास्त थांबू शकतील. १ मेपासून अशा २९ विश्रामगृहांची ऑनलाइन बुकिंग होईल. जुलैपर्यंत त्यांची संख्या ५८ होईल.
२६ चित्रपटांचे चित्रीकरण, अमरनाथ यात्रेमुळे पर्यटनास चालना
चित्रीकरण : काश्मिरात २६ बॉलीवूडचे चित्रीकरण पूर्ण झाले. वेब मालिकांचेही चित्रीकरण सुरू आहे.
दहशतवादी कारवाया कमी, दगडफेक अन् बंदही नसल्याने पर्यटनात होतेय सुधारणा
- दगडफेक व बंदच्या घटनांमध्ये घट. दहशत दक्षिण काश्मीरच्या काही भागातच मर्यादित.
- महामारीमुळे विदेशातील प्रवास नाही. यामुळे पर्यटक काश्मीर- हिमाचलला येत आहेत.
- देशातील मोठ्या शहरांमधून श्रीनगरसाठी थेट उड्डाण सुरू केले. रात्रीच्या उड्डाणांनाही मंजुरी मिळाली.
- पर्यटन विभागाने पर्यटकांना प्रोत्साहन देण्यासाठी काश्मीरच्या विविध शहरांमध्ये रोड शो घेतले.
अमरनाथ यात्रा : २८ जूनपासून सुरू होणाऱ्या अमरनाथ यात्रेनंतर पर्यटकांचा ओढा अधिक वाढेल.
नवे मार्ग : १ मेपासून १० पेक्षा अधिक नवीन ठिकाणे खुली होतील. सोनमर्गमध्ये १५ हजार पर्यटकांची रेलचेल आहे.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.