आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • For The First Time, Janmotsav Aarti Was Broadcast Live On Ram Navami.|Marathi News

अयोध्या:प्रथमच रामनवमीला जन्मोत्सव आरतीचे झाले थेट प्रसारण, रामजन्मभूमी परिसरातील तात्पुरत्या मंदिरात विराजित रामलल्लाच्या दर्शनासाठी भक्तांची गर्दी उसळली

अयोध्याएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

अयोध्येत यंदा रामनवमी विशेष ठरली. रामजन्मभूमी परिसरातील तात्पुरत्या मंदिरात विराजित रामलल्लाच्या दर्शनासाठी भक्तांची गर्दी उसळली. दुपारी १२ वाजता जन्मोत्सव सुरू होताच शरयू तटापासून संपूर्ण अयोध्यानगरी ‘भए प्रकट कृपाला...’च्या जयघोषाने दुमदुमली. प्रथमच रामजन्मस्थान आणि कनक भवन येथून जन्मोत्सव तसेच आरतीचे थेट प्रसारण झाले.

राम मंदिराचे बांधकाम सुरू झाल्यानंतरची ही सर्वात भव्य रामनवमी ठरली. कारण कोरोनामुळे गेली दोन वर्षे हा उत्सव सांकेतिक पद्धतीनेच साजरा झाला होता.