आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • For The First Time, Researchers Will Be Able To Decode The Genome Completely, Help Diagnose Genetic Diseases | Marathi News

दिव्‍य मराठी विशेष:पहिल्यांदाच संशोधकांना जीनोम पूर्ण डिकोड करण्यात यश, जनुकीय आजारांचे निदान शक्य, 8 टक्के जीनोम संसर्गाशी लढण्यास मदत करतील

वॉशिंग्टन5 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

संशोधकांनी मानवी जनुकीय आराखड्याचा आता संपूर्ण अभ्यास केला आहे. आता जनुकीय आजारांना लक्षात घेणे सुलभ होऊ शकेल. सायन्स नियतकालिकात प्रकाशित लेखातून संशोधकांच्या गटाने हा दावा केला आहे. २००३ मध्ये ह्यूमन जीनोम प्रोजेक्टने जनुकीयदृष्ट्या ९२ टक्के अध्ययन पूर्ण केले होते. ही घटना ऐतिहासिक मानली गेली. आता वीस वर्षांनंतर जीनोमच्या उर्वरित ८ टक्के गोष्टींचा अभ्यासही यशस्वी पूर्ण केला. म्हणूनच पहिल्यांदाच मानवी जनुकीय आराखड्याचा संपूर्ण अभ्यास होऊ शकला.

दीर्घ गुणसूत्रांना समजून घेऊ शकणाऱ्या सिक्वेन्सिंग तंत्रज्ञानामुळे हे शक्य झाले आहे. या तंत्रामुळे संशोधकांना गुणसूत्राच्या आराखड्याला सूक्ष्म पातळीवर पाहता आले. त्यात संशोधकांना आतापर्यंत सुटलेल्या घटकांची आेळख पटली. यातून जीनोमचे नेमके स्थान समजू शकले. थोडक्यात, १००० तुकड्यांच्या कोड्याचे रूपांतर १०० तुकड्यांत करण्यात आले. यातून त्याची नेमकी संरचना स्पष्ट झाली. संशोधकांच्या गटाने ३०५.५ कोटी जीनोम आधारित जोड्यांचे अध्ययन केले. याद्वारे मानवी शरीराचे क्राेमोझोम व जीन्सची निर्मिती होते. वास्तविक आपल्या सर्वांना स्वतंत्र आेळख देण्यामागे हीच रचना कारणीभूत असते. संशोधनामुळे प्रत्येक डीएनए स्वतंत्रपणे पाहून आजारांचे निदान व प्रभावाबद्दलची माहिती मिळेल.

८ टक्के जीनोम संसर्गाशी लढण्यास मदत करतील
वॉशिंग्टन विद्यापीठाच्या हार्वर्ड ह्यूजेस मेडिकल इन्स्टिट्यूटमध्ये संशोधन विभाग व प्रकल्पाचे प्रमुख इवान आयक्लर म्हणाले, या जीनोममध्ये इम्युन रिस्पॉन्स जीन्स आढळले आहेत. त्यांचा उपयोग संसर्गाशी लढण्यास होऊ शकतो. मानवी मेंदू इतर प्राण्यांच्या तुलनेत मोठा असण्यामागेही हेच कारण ठरतात.

बातम्या आणखी आहेत...