आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • For The First Time Since The 1962 War, The People Of Mana Village Reached Devtal Lake, The Second Highest Lake In The Country To Worship Their Ancestors.

उत्तराखंड:1962 च्या युद्धानंतर पहिल्यांदा आपल्या पूर्वजांचे पूजन करण्यासाठी देशातील दुसऱ्या सर्वात उंचीवरील देवतळ तलावावर पोहोचले माना गावचे लोक

जोशीमठ2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

चीनच्या सीमेजवळ देशातील दुसऱ्या सर्वात उंचीवरील (१७,९९८ फूट) देवतळ तलावाचे हे छायाचित्र आहे. १९६२ मध्ये झालेल्या भारत-चीन युद्धानंतर पहिल्यांदाच माना गावातील लोकांनी देवतळ तलावाचे दर्शन घेतले. गावचे सरपंच पितांबर सिंह सांगतात की, गावापासून ५८ किलोमीटरवर माना ही जगातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात उंचीवरील खिंड आहे. पूर्वी याच मार्गाने लोक चीनमध्ये व्यापार करण्यासाठी जात असत. वाटेत देवतळ तलावावर पूर्वजांना तर्पण करण्याची जुनी परंपरा आहे, परंतु युद्धानंतर येथे जाण्यास बंदी होती. मात्र, या वेळी १८ जणांना विशेष परवानगी देण्यात आली. - माहिती संकलन : मनमीत

बातम्या आणखी आहेत...