आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • For The First Time Since The 1962 War, Two Lakh Indian Troops Were Deployed On The LAC

एलएसी:1962 च्या युद्धानंतर एलएसीवर प्रथमच भारताचे दोन लाख जवान, फेब्रुवारीत ताेफांसह फक्त 150 मीटर दूर तैनात होती दोन्ही सैन्ये

नवी दिल्ली24 दिवसांपूर्वीलेखक: मुकेश कौशिक
  • कॉपी लिंक
सीडीएस जनरल बिपिन रावत यांनी एलएसीजवळील भागांचा आढावा घेतला. - Divya Marathi
सीडीएस जनरल बिपिन रावत यांनी एलएसीजवळील भागांचा आढावा घेतला.

भारताने गेल्या काही दिवसांत चीन सीमेवर ५० हजार अतिरिक्त जवान तैनात केले आहेत. १९६२ च्या युद्धानंतर प्रथमच एलएसीवरील भारतीय सैनिकांची संख्या २ लाखांजवळ पोहोचली आहे. चीनने गेल्या ३ महिन्यांत भारतीय सीमेजवळ २ लाख सैनिक तैनात केल्याने भारतानेही कुमक वाढवली. दरम्यान, ब्लूमबर्गने ४ वेगवेगळ्या सूत्रांच्या हवाल्याने म्हटले आहे की भारताने चीनलगतच्या सीमेवरील ३ विविध भागांत लष्करी तुकड्यांसह लढाऊ विमानांची स्क्वॉड्रन तैनात केली. एलएसीवर भारतीय जवानांची कुमक गतवर्षाच्या तुलनेत ४०% वाढवली आहे. एका खोऱ्यातून दुसऱ्या खाेऱ्यात सैनिकांना एअरलिफ्ट करण्यासाठी अधिक हेलिकॉप्टर तैनात आहेत. त्याद्वारे एम ७७७ होवित्झरसारख्या तोफाही एअरलिफ्ट केल्या जाऊ शकतात.

दोन्ही लष्करांनी फेब्रुवारीत जवानांची संख्या घटवण्याचा समझोता केला होता. मात्र चीनने उलट लष्करी सराव सुरू केला. यामुळे भारतानेही जवानांची तैनात वाढवली. दुसरीकडे, चीनने तिबेटच्या वादग्रस्त सीमेवर नव्या रनवे इमारती, लढाऊ विमान ठेवण्यासाठी बाॅम्बरोधक बंकर व एअरफील्ड्स उभारणे सुरू केले. तसेच लांब पल्ल्याची शस्त्रे, तोफा, रॉकेट रेजिमेंट व २ इंिजनयुक्त फायटर जेट्सही तैनात केले. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी मंगळवारी चीफ आॅफ डिफेन्स स्टाफ जनरल बिपिन रावत व इतर आधिकाऱ्यांची बैठक घेतली.

फेब्रुवारीत ताेफांसह फक्त १५० मीटर दूर तैनात होती दोन्ही सैन्ये, आता ८ किमीचे अंतर... मात्र दोन्हीकडे आधीपेक्षा जास्त जवान
चीफ ऑफ द डिफेन्स स्टाफ जनरल बिपिन रावत यांनी मंगळवारी एलएसीजवळील भागांचा दौरा केला. दुसरीकडे, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, गृहमंत्री अमित शहा व एनएसए अजित डोभाल यांच्यासोबत बैठक घेतली. फेब्रुवारीत दोन्ही सैन्ये माघार घेऊन जवानांची संख्या घटवतील, असा समझोता झाला होता. मात्र चीनच्या आडमुठेपणानंतर आता उभय सैन्ये ८ किमीच्या अंतरावर एकमेकांसमोर तैनात आहेत.

या वेळी भारतीय लष्कराची ‘आक्रमक मोर्चेबंदी’, चीनने आगळीक केल्यास त्याच्या भागात होऊ शकते कारवाई
एलएसीवर सैन्य वाढवण्याचा हेतू काय आहे?
आमचा उद्देश आपली तयारी भक्कम ठेवणे हा आहे. कारण चीनने लडाखपासून अरुणाचलपर्यंत सैन्य वाढवले आहे. लडाखमध्ये लष्करी सराव सुरू केले आहेत. ते लक्षात घेऊन आम्ही संरक्षणात्मक तयारीचा नव्याने आढावा घेतला. कमांडर्स कॉन्फरन्समध्ये असे समोर आले की, उत्तर आणि दक्षिण पँगाँगमधून दोन्ही लष्करांनी माघार घेतल्यानंतरही चीनने तैनाती कमी केली नाही. उलट, त्याने आपली संपूर्ण हवाई संरक्षण यंत्रणा तैनात केली आहे.

भारताची रणनीती काय आहे?
आम्ही ‘मिरर डिप्लॉयमेंट’चे धोरण अवलंबले आहे. म्हणजे जेवढे सैन्य शत्रूचे, तेवढेच आपले. चीनने गेल्या वर्षी वार्षिक लष्करी सरावानंतर लगेचच आपल्या हालचाली उत्तर पँगाँग आणि गलवान खोऱ्यात वाढवल्या होत्या. त्यामुळे चार ठिकाणी दोन्ही सैन्य समोरासमोर आले.

मिरर डिप्लॉयमेंटचा काय फायदा होईल?
आतापर्यंत भारतीय सैन्याच्या उपस्थितीचा उद्देश चीनच्या हालचाली रोखणे हा होता, पण नव्या तैनातीनंतर आता भारतीय कमांडर्सकडे हल्ला करणे आणि गरज भासल्यास चीनच्या भागात घुसून त्यावर कब्जा करण्याचा पर्यायही असेल. या रणनीतीला ‘आक्रमक मोर्चेबंदी’ (ऑफेन्सिव्ह डिफेन्स) म्हटले जाते.

लडाखमध्ये सर्वाधिक तणाव कुठे आणि का?
लडाखच्या उत्तर भागात जास्त तणाव आहे. या भागातच गेल्या वर्षी भारत-चीनमध्ये अनेकदा चकमकी झाल्या होत्या. भारताने येथे आधीच्या तुलनेत सुमारे २० हजार सैनिक वाढवले आहेत. हे सैनिक आतापर्यंत पाकिस्तानविरुद्ध दहशतवाद प्रतिबंधक मोहिमेअंतर्गत काश्मीरमध्ये तैनात होते.

फक्त सैन्य वाढवल्याने चीनवर नियंत्रण राहील?
तसे वाटत नाही, पण आपल्याला तयार राहावे लागेल. त्यामुळे एलएसीजवळ तैनात सैनिकांना युद्धसामग्री पुरवण्यासाठी ७४ कायमस्वरूपी व ३३ बॅली ब्रिजच्या माध्यमातून नवे रस्ते अलीकडेच बनवले आहेत.

चीनने हवाई दलाच्या हालचालीही वाढवल्या आहेत, प्रत्युत्तरासाठी आपली तयारी काय आहे?
अंबालात राफेलची गोल्डन अॅरो तुकडी पूर्व लडाखला हवाई ताकद देण्यासाठी तैनात करण्यात आली आहे. माउंटन स्ट्राइक कोअर पूर्णपणे सक्रिय झाली आहे. तिच्या एअर एलिमेंटमध्ये याच वर्षी राफेलची पहिली तुकडी तैनात होईल, ती हाशिमारा येथून कार्यरत राहील. सिक्कीम, भूतान आणि तिबेटच्या त्रिकोणाजवळ हाशिमारा हवाई तळावर राफेलच्या तैनातीमुळे आपण ७०० ते १६०० किलोमीटरपर्यंत ऑपरेटिंग एअर रेंजवर सक्रिय राहू शकू.

सैन्य वाढवल्याने वाद कसा मिटणार?
वाद दोन प्रकारांद्वारे मिटेल. पहिला- लष्करी कमांडर्सची चर्चा, जी ठरवलेल्या वेळेनुसार होत आहे.दुसरी पद्धत आहे- कूटनीतिक चर्चा. त्याची २२ व्या टप्प्याची बैठक २५ जूनला झाली. चीनने सैन्य वाढवले तर आम्हीही वाढवू आणि त्याने घटवले तर आम्हीही घटवू, हे आम्ही चीनला स्पष्टपणे सांगितले होते. दोन्ही सैन्य वादग्रस्त भागात गस्त घालत असताना सैनिकांची जास्त तैनाती जोखमीची आहे, अशा स्थितीत छोट्याशा घटनेचे रूपांतर मोठ्या संघर्षात होऊ शकते याची जाणीव आम्हाला आहे.

- भारतीय लष्कराच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार.

बातम्या आणखी आहेत...