आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • For The First Time Since The New JEE Format Was Introduced, The 5 Main Categories Dropped 3 4 Percentile

काेटा:जेईईचा नवीन फाॅरमॅट लागू झाल्यानंतर प्रथमच 5 मुख्य श्रेणींत 3-4 पर्सेंटाइल घटले, जनरलचा कट ऑफ इतरांच्या हायर पर्सेंटाइलहून जास्त

दीपक आनंद | जयपूर/ प्रवीण जैन | काेटाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

वर्ष २०१९ पासून जेईई मेनचा नवा फॉरमॅट सुरू झाल्यानंतर २०२१ मध्ये सर्व मुख्य पाच प्रवर्गाच्या कट ऑफमध्ये घसरण नोंदली गेली आहे. जेईई मेन ते अॅडव्हान्सच्या कट ऑफमध्ये प्रवर्गनिहाय सरासरी तीन ते चार पर्सेंटाइलची घसरण झाली आहे. सर्व साधारण प्रवर्गाचा कट ऑफ २.४७७३०९४ पर्सेंटाइल घसरला आहे. एनटीएने प्रथमच हायर पर्सेंटाइल स्कोअर जारी केला आहे. त्यात हा आश्चर्यकारक पैलू समोर आला आहे की, अनारक्षित वर्गाचा केअर कट ऑफ इतर प्रवर्गांच्या हायर कट ऑफपेक्षा जास्त राहिला.

जेईई मेनबाबत निर्माण झालेल्या वादादरम्यान एनटीएने गैरप्रकारामुळे २० विद्यार्थ्यांना परीक्षेतून तीन वर्षांसाठी बाहेरही केले आहे. आयआयटीत सुपर न्यूमररी कोटा निश्चित झाल्यानंतर या वर्षी परीक्षा देणाऱ्या विद्यार्थिनींच्या संख्येतही घसरण झाली आहे. या वर्षी २.८० लाख विद्यार्थिनींनी मेन दिली, गेल्या वर्षी ही संख्या ३.०८ लाख होती. महिला राज्य टॉपर्सच्या यादीत चार मुलींनाच १०० पर्सेंटाइल स्कोअर करता आला.

दोन सत्रांत ४५ ते ५५ दिवसांचे अंतर आवश्यक
फिटजी जयपूरचे सेंटर हेड ध्रुव बॅनर्जी म्हणाले, प्रथमच वर्षात चार वेळा मेन झाली. फेब्रुवारी/मार्च आणि जुलै/ऑगस्टच्या सत्रांच्या निकालात फरक पडला कारण पहिल्या दोन सत्रांनंतर विद्यार्थ्यांना तयारीसाठी वेळ मिळाला. वर्षात तीन पेक्षा जास्त वेळा परीक्षा होऊ नये. दोन सत्रांत किमान ४५ ते ५५ दिवसांचे अंतर असावे.

श्रेणीनिहाय हायर पर्सेंटाइल
श्रेणी कमाल पीएस टीओटी

ईडब्ल्यूएस 87.89500071
ओबीसी एनसीएल 87.8950071
एससी 87.8950071
एसटी 87.8474721
अनरिझर्व्हड (यूआर) 100.0000000
यूआर पीएच 87.8273359

बातम्या आणखी आहेत...