आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • For The Third Time In History And The Second Time In Four Years, A Bench Of Women Judges In The Supreme Court; Hearing Of 32 Cases

इतिहासामध्ये असे तिसऱ्यांदा अन् चार वर्षांमध्ये दुसऱ्यांदा:सुप्रीम कोर्टात महिला न्यायमूर्तींचे खंडपीठ; 32 प्रकरणांची सुनावणी

दिव्य मराठी नेटवर्क | नवी दिल्ली2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

सहसा सुप्रीम कोर्टात महिला न्यायाधीशांचे वेगळे पीठ तयार होत नाही. मात्र, गुरुवारी केवळ महिला न्यायाधीशांचे पीठ तयार झाले आहे. न्या. हिमा कोहली आणि न्या. बेला एम. त्रिवेदी यांचे पीठ कोर्ट नंबर ११ मध्ये स्थापन झाले. पीठाने ३२ प्रकरणांची सुनावणी घेतली. पैकी १० कौटुंबिक वाद होते. ११ जामिनाशी संबंधित स्थलांतरित याचिका आणि इतर ११ वेगवेगळ्या वादांशी संबंधित होते. ज्येष्ठ विधिज्ञ आदिशचंद्र अग्रवाल म्हणाले, सुप्रीम कोर्टाच्या इतिहासात असे तिसऱ्यांदा घडले. प्रथम २०१३ मध्ये न्या. ज्ञानसुधा मिश्रा व न्या. रंजना प्रकाश देसाई यांचे पीठ तयार झाले होते. दुसऱ्यांदा २०१८ मध्ये पीठ झाले. सुप्रीम कोर्टात तीन महिला न्यायाधीश आहेत. न्या. हिमा कोहली, न्या. बी. व्ही. नागरत्ना आणि न्या. बेला एम. त्रिवेदी.

पहिल्या पीठाच्या न्या. रंजना देसाई म्हणाल्या न्यायाची खुर्ची एकच... फक्त भेदभाव होऊ नये ‘सुप्रीम कोर्टाच्या इतिहासात प्रथमच संपूर्ण महिला पीठाची सदस्या म्हणून माझे नाव नोंदवले गेले. माझ्यासोबत दुसऱ्या सदस्या न्या. ज्ञानसुधा मिश्रा होत्या. तथापि, असा भेदभाव होऊ नये, असे माझे वैयक्तिक मत आहे. न्यायाच्या खुर्चीवर महिला काय आणि पुरुष काय. पुरुष जितके चांगले किंवा वाईट असू शकतात, तितक्याच महिलादेखील वाईट किंवा चांगल्या असू शकतात. खुर्चीवर महिला होती की पुरुष, याने काहीच फरक पडत नाही. निवड आणि नियुक्ती गुणवत्तेच्या आधारेच होते.’ (न्या. देसाई या प्रेस कौन्सिलच्या विद्यमान अध्यक्षा आहेत. योगायोगाने त्या याच्याही पहिल्या महिला अध्यक्षा आहेत.)

बातम्या आणखी आहेत...