आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

नवी दिल्ली:चीनविरोधात शक्ती एकवटल्या, सीमेवर तणावामुळे ध्रुवीकरण

नवी दिल्ली10 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • चीनच्या चलाखीवर आंतरराष्ट्रीय तज्ञांचे मत

साथरोगाचा परिणाम आता कूटनितीच्या आघाडीवर उघडपणे झालेला दिसून येत आहे. आपल्याविरोधात जागतिक संतापाची भावना उफाळलेली पाहून चीनने शांत शक्तीचा उदय असलेला मुखवटा हटवला आहे. दक्षिण चीन सागराच्या १६ हजार फूट उंचीवर असलेल्या वादग्रस्त पेंगाँग सरोवरापर्यंत त्यांचे लष्कर आपली चीड व्यक्त करत आहे. साथरोगामुळे जगाचे कूटनितीक चित्र कायमचे बदलले जात आहे. नवी जागतिक संरचना ज्या स्वरुपात सामाेरी येईल, त्याची रुपरेषा तयार झाली आहे. आिण पीपल्स लिबरेशनन आर्मीच्या निर्णयामुळे ही प्रक्रिया गतीमान होत आहे. साथरोगानंतर सामरिक, कूटनितीक व आर्थिक निर्बंध कशा प्रकारचे असतील याची पडताळणी भास्करनेप्रमुख राजदूत व जागतिक व्यवस्थेची नाडी ओळखणाऱ्या मान्यवरांशी बातचित केली.तज्ञांच्या मते, कोरोनाची पाळेमुळे रोवलेल्या चीनची गरज भासणार आहे. परंतु कालांतराने एक लाइक माइंडेड ग्रुप (एलएमजी) उभा राहिल. तो चीनला त्याच्या चुका दाखवून देईल. माजी राजदूत विष्णू प्रकाश यांच्यापासून किंग्ज कॉलेज लंडनमध्ये आंतरराष्ट्रीय घडामोडीवरील तज्ञ हर्ष पंत व अनेक देशांत राजदूत राहिलेले गौतम बम्बावलेपासून एका माजी सचिवांनी एकमताने सांगितले, चीनविरोधात जगभरात खदखद आहे. हा राग चीनच्या हुकूमशाही राजवटीचा परिणाम आहे.

कोरोनामुळे चीनच्या प्रतिष्ठेला धक्का 

चीन महाशक्ती म्हणून उदयास येत आहे. कोरोनामुळे त्यांच्या प्रतिष्ठेला धक्का बसला आहे. त्याच्याविरोधात कोण उभा ठाकेल, हे पाहण्याची गरज आहे. जग आता स्वदेशी मुद्यावर लक्ष केंद्रित करेल. प्रत्येक देश स्वत:चा अधिक विचार करेल. जागतिकीकरण मागे पडेल. -हर्ष वी पंत, प्रोफेसर, किंग्स कॉलेज, लंडन

चीनने अत्यंत बेजबाबदार वर्तन केेले

या साथरोगामुळे कोणताही देश फायद्यात नाही. पण चीनला सर्वाधिक फटका बसलेला असेल. चीनने अत्यंत बेजबाबदार वर्तन केेले. लाइक माइंडेड देशांचा गट तयार होईल. या गटाचे नेतृत्व फ्रान्ससारखा यूरोपीय देश करू शकतो. तर रशिया व भारत त्यांना मदत करतील. -विष्णु प्रकाश, माजी राजदूत

हा गंभीर साथरोग दडवून ठेवल्याने चीनची नैतिक प्रतिष्ठा खूप खालावली

जग नेतृत्वहीन होत चालले आहे. जगातील सर्वात शक्तिशाली देश अमेरिकेला अंतर्गत समस्यांनी वेढले आहे. कोरोना संकटामुळं त्याची ताकद कमी होत चालली आहे. हा गंभीर साथरोग दडवून ठेवल्याने चीनची नैतिक प्रतिष्ठा खूप खालावली आहे. यामुळे नेतृत्वाचे संकट काही शक्ती ही उणीव भरून काढतील. भारताची वसुधैव कुटुंबकमची संकल्पना आशेचा किरण निर्माण करेल. या मूल्यांवरून भारत जगाचे नेतृत्व करण्याची संधी साधू शकतो. यासाठी भारताला तीन मुद्याकडे लक्ष द्यावे लागेल. -गौतम बम्बावले, चीन,पाकिस्तान, भूतानमध्ये भारताचे माजी राजदूत

बातम्या आणखी आहेत...