आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Foreign Arrivals Down 45% Year on year, But Foreign Exchange Earnings Up 26%, Domestic Tourists Up 11%

वर्षभरात परदेशातून येणारे 45% घटले:पण परकीय चलनाद्वारे वाढली 26% कमाई, देशांतर्गत पर्यटकांत 11% वाढ

नवी दिल्ली4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • कोठून? सर्वाधिक येताहेत अमेरिकन पर्यटक, जास्त दिवस थांबण्यात चिनी पुढे

कोरोना निर्बंधांमुळे २०२१ मध्ये १५.२७ लाख विदेशी पर्यटकच भारतात आले. २०२० मध्ये आकडा २७.४ लाख होता. म्हणजे ४४.५% घट झाली. असे असतानाही २०२१ मध्ये परकीय चलनाद्वारे कमाई २६% वाढून ~६५ हजार कोटींवर पोहोचली. ती २०२० मध्ये ५० हजार कोटी रु. होती. सर्वाधिक ४.२९ लाख पर्यटक अमेरिकेतून आले, तर विदेशातून येणाऱ्यांपैकी सर्वाधिक ३.१ लाख लोक पंजाबला गेले. सर्वाधिक ४५% विदेशी पर्यटक फिरण्यासाठी तामिळनाडूतील ग्रुप ऑफ माॅन्युमेंट्सला गेले. तर देशांतर्गत पर्यटकांसाठी अजूनही ताजमहाल, लाल किल्ला व कुतुबमिनार टॉप-३ मध्ये आहेत.

राज्य... येथील लोक तामिळनाडूला जास्त जाताहेत, विदेशींना पंजाब पसंत
राज्य देशी
तामिळनाडू ११.५३
यूपी १०.९७
आंध्र प्रदेश ९.३२
कर्नाटक ८.१०
महाराष्ट्र ४.३०
(देशी पर्यटक कोटींत)

राज्य विदेशी पंजाब ३.१ महाराष्ट्र १.८ दिल्ली १.० कर्नाटक ०.७ केरळ ०.६ (विदेशी पर्यटक लाखांत)

चिनी सरासरी ९८ दिवस थांबतात
देश सरासरी दिवस
चीन ९८.१५
येमेन ७२.६१
थायलंड ७१.११
इराण ६५.४०

कोण? विदेशातून येणाऱ्यात ४५ ते ५४ वयाचे जास्त, जाणाऱ्यात २५-३४ चे टॉप
गेल्या वर्षी विदेशातून येणाऱ्या प्रवाशांत सर्वात मोठा वाटा (२१.८%) ४५ ते ५४ वर्षे वयोगटांचा आहे. इतकेच नाही तर २००१ ते २०२१ पर्यंत विदेशी पर्यटकांची इतकी भागीदारी कोणत्याही वयोगटाची नव्हती. यापूर्वी २०१४ मध्ये ४५-५४ वर्षांचे २०.१% विदेशी पर्यटक भारतात आले होते. हा विक्रम होता. तथापि, भारतातून इतर देशांत जाणाऱ्या लोकांमध्ये २५ ते ३४ वर्षे वयोगटातील सर्वाधिक (३०.९%) आहेत आणि ३५-४४ वर्षे वय असलेल्यांच्या यादीत दुसऱ्या स्थानी आहेत. देशातून जाणाऱ्यांत सर्वाधिक ९८.५% लोकांनी विमान प्रवास केला. केवळ ०.८% लोक रस्तेमार्गे आणि तितकेच लोक सागरीमार्गे
विदेशात गेले.

विदेशी पर्यटकांत ४०% महिला
{विदेशातून येणाऱ्यात ४०% महिला व ६०% पुरुष आहेत, तर भारतातून विदेशात जाणाऱ्यात ७२% भागीदारी पुरुषांची व २८% महिलांची आहे.
{ट्रॅव्हल अँड टुरिझम डेव्हलपमेंट इंडेक्सनुसार, ११७ देशांच्या यादीत जपान प्रथम, अमेरिका दुसऱ्या व स्पेन तिसऱ्या स्थानी आहे. भारत ५४, श्रीलंका ७४, पाक ८३, बांगलादेश १०० व नेपाळ १०२व्या स्थानी आहे.

का? ४२% भारतीय फिरायला जातात, २१ टक्के विदेशी उपचारासाठी येतात
हे जाणून तुम्हाला आश्चर्य वाटेल की, विदेशातून येणाऱ्यात जेमतेम ६% लोकच फिरण्यासाठी किंवा सुट्या घालवण्यासाठी येतात. सर्वाधिक ३९% अनिवासी भारतीय असतात. ते वेगवेगळ्या देशांत राहतात. याशिवाय २१% विदेशी पाहुणे भारतात उपचारासाठी येतात. १२% लोकांचा उद्देश बिझनेस व २% लोक शिक्षणासाठी भारतात येतात. तर भारतातून विदेशात जाणाऱ्यांपैकी ४२% केवळ सुट्या घालवण्यासाठी जातात. इतर ४२% अनिवासी भारतीय प्रवासी असतात. १२% लोक बिझनेस व २.६% शिक्षणासाठी विदेशवारी करतात. २०२१ मध्ये भारतीय पर्यटक सर्वाधिक सरासरी २०१ दिवस पोर्तुगालमध्ये राहिले.

कोरिया-चीनचे बिझनेससाठी आले
{इराकमधून येणाऱ्यांत सर्वाधिक ९५% आणि मालदीवचे ८५% लोक उपचारासाठी भारतात आले.
{नायजेरियातून ३१% लोक शिकण्यासाठी आले.
{कोरियाचे पर्यटक सर्वाधिक ९२% व जपानचे ९१% लोक बिझनेससाठी भारतात आले. चीनच्या ७३% प्रवाशांचा उद्देश बिझनेस हाच होता.

८६% भारतीय पर्यटक १० देशांतच फिरले
{कोरोना असतानाही २०२१ मध्ये देशी पर्यटक ११% वाढले. २०२० मध्ये आकडा ६१ कोटी होता, पण २०२१ मध्ये ६८ कोटींच्या आसपास पोहोचला.
{भारतीय पर्यटकांपैकी ८६% केवळ अमेरिका, कॅनडा, ब्रिटन व यूएईसह १० देशांतच गेले.
{६०% विदेशी पर्यटक दिल्ली, मुंबई विमानतळाहून येत आहेत. यात ४५% दिल्ली विमानतळाचे आहेत.

बातम्या आणखी आहेत...