आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
भारत सरकारने कलम 370 हटवल्यानंतर जम्मू काश्मीरचा दौरा करण्यासाठी 24 देशांचे डिप्लोमॅट्स बुधवारी 2 दिवसांच्या दौऱ्यावर आले आहेत. डिप्लोमॅट्सने पहिले श्रीनगरचे महापौर, जिल्हा विकास परिषद आणि ब्लॉक डेव्हलपमेंट काँन्सिलच्या अध्यक्षांची भेट घेतली.
या डेलीगेशनचे युरोपीय यूनियनचे भारतातील राजदूत उगो एस्टुटो नेतृत्व करत असून, यात फ्रांसचे राजदूत इमॅनूएल लिनेन आणि ऑर्गनायजेशन ऑफ इस्लामिक कॉर्पोरेशनचे सदस्यही आहेत. हा दौरा भारत सरकारच्या गृह मंत्रालयाने आयोजित केला आहे.
आंदोलक, मीडिया आणि अधिकाऱ्यांसोबत बैठक
हे डिप्लोमॅट्स DDC चे नवनिर्वाचीत सदस्य, सोशल व राजकीय आंदोलनक, मीडिया व नागरी प्रशासनाचे अधिकारी आणि सैन्यातील जवांनासोबत बैठक करणार आहेत. प्रशासनाचे अधिकारी हे जम्मू-काश्मीरात कलम 370 हटवल्यानंतर झालेल्या कामाचा आढावा देतील. सैन्य आणि सुरक्षा विभागाचे अधिकारी सुरक्षासंदर्भांत माहिती देणार आहेत.
प्रतिनिधिमंडळांने स्थानिक स्वराज संस्थेंच्या नवनिर्वाचित प्रतिनिधीशी बैठक केली
प्रतिनिधीमंडळांने यापूर्वी श्रीनगरचे महापौर, डीडीसीचे अध्यक्ष, बीडीसीचे अध्यक्ष आणि सर्व पक्षाच्या नगरपरिषेदेच्या नगरसेवकांची भेट घेतली. यानंतर त्यांचा श्रीनगरच्या डाल तलावातील शिकारा आणि गुलमर्गला जाण्याचा कार्यक्रम आहे. तसेच, 18 फेब्रुवारीला जम्मू काश्मीरात पोहचल्यानंतर मनोज सिन्हा यांची भेट घेतील.
या देशातील डिप्लोमॅट्सचा समावेश
शिष्टमंडळात चिली, ब्राझील, क्युबा, बोलिव्हिया, एस्टोनिया, फिनलँड, फ्रान्स, आयर्लंड, नेदरलँड्स, पोर्तुगाल, युरोपियन युनियन, बेल्जियम, स्पेन, स्वीडन, इटली, बांग्लादेश, मलावी, एरिट्रिया, आयव्हरी कोस्ट, घाना, सेनेगल, मलेशिया, ताजिकिस्तान, किर्गिस्तानच्या प्रतिनिधिंचा समावेश आहे.
370 हटवल्यानंतर हा चौथा कार्यक्रम
भारत सरकारने 5 ऑगस्ट 2019 ला कलम-370 रद्द केल्यानंतर परदेशी प्रतिनिधिमंडळांचा जम्मू-काश्मीरात हा चौथा दौरा आहे. यापूर्वी ऑक्टोबर 2019, जानेवारी आणि फेब्रुवारी 2020 मध्ये शिष्टमंडळांने जम्मू-काश्मिराचा दौरा केला होता.
पाकिस्तानाने विदेशी शिष्टमंडळांसमोर काश्मीर मुद्दा उठवला
पाकिस्तानाने मंगळवारी इस्लामाबाद येथे डिप्लोमॅटस मिशनच्या हेडला काश्मिरच्या सध्याच्या वातावरणाबद्दल माहिती दिली. पाकच्या परराष्ट्र मंत्रालयाने जारी केलेल्या निवेदनामध्ये म्हटले आहे की, परराष्ट्र सचिव सोहेल महमूदने शिष्टमंडळाला ब्रीफ केले. आंतरराष्ट्रीय समुदायाने संयुक्त राष्ट्र संघाच्या प्रस्तावानुसार काश्मीर प्रश्न सोडवण्यासाठी आवाहन केले आहे. त्याचबरोबर भारताने पाकिस्तानला अतर्गंत बाबीवर भाष्य न करण्यास सांगितले आहे.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.