आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामथुरेतील वृंदावन येथील किकी नागला येथे शनिवारी परदेशी कृष्ण भक्तांनी फुलांची होळी खेळली. यावेळी इंग्लंड, रशिया, युक्रेनसह 32 देशांतील भाविकांनी डीजेच्या आणि भजनाच्या तालावर जल्लोष केला. त्यानंतर एकमेकांवर फुलांची उधळण करून होळी खेळली. भाविकांनी एकमेकांवर इतकी फुले उधळली की फुलांचा थर साचला.
युक्रेनहून आलेल्या शंकर दासी म्हणाल्या– खूप चांगले सेलिब्रेशन झाले
युक्रेनहून आलेल्या शंकर दासी यांनी सांगितले की, गुरुजींसोबत होळी खेळली आणि भक्तांसोबत भजन म्हटले. खूप छान उत्सव झाला. दुसरीकडे, जर्मनीहून आलेल्या विश्व मोहिनीने सांगितले की, 2014 मध्ये पहिल्यांदा वृंदावनमध्ये होळी खेळली होती. त्यानंतर मी आता आली आहे. खूप छान वाटत आहे.
गिरखडी दासी म्हणाल्या- आज माझे मन आनंदाने भरले
जर्मनीत राहणाऱ्या गिरखडी दासी यांनी सांगितले की, त्या विश्वानंद महाराजांची शिष्या आहेत. 'मी खूप आनंदी आहे कारण वृंदावन हे अतिशय सुंदर शहर आहे,. आज माझे मन आनंदाने भरून आले आहे.' त्याचवेळी अमेरिकेत राहणारे देव नारायण दास यांनी सांगितले की, मी पहिल्यांदाच भारतात आलो आहे. फुलांची होळी अप्रतिम आहे. मी स्वतःला खूप भाग्यवान समजतो.
छायाचित्रांमध्ये पाहा परदेशी कृष्ण भक्तांचा होळीचा जल्लोष...
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.