आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करादेशभरात ५,७८९ संस्थांचा विदेशी अंशदान विनियमन कायद्यांतर्गत (एफसीआरए) नोंदणी परवाना शनिवारी संपुष्टात आला आहे. यात दिल्ली आयआयटी, जामिया मिलिया इस्लामिया, इंडियन मेडिकल असोसिएशन (आयएमए), लालबहादूर शास्त्री मेमोरियल फाउंडेशन, लेडी श्रीराम कॉलेज फॉर वुमन, दिल्ली कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग व ऑक्सफॅम इंडिया, ऑल इंडिया मारवाडी युवा मंच आदी संस्थांचा समावेश आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या संस्थांनी एफसीआरए परवाना नूतनीकरणासाठी अर्ज केला नाही किंवा किंवा गृह मंत्रालयाने एखाद्या कारणावरून अर्ज फेटाळला आहे. एफसीआरएच्या अधिकृत वेबसाइटवर अपलोड माहितीनुसार, शनिवारपर्यंत एकूण सक्रिय संस्थांची संख्या २२,७६२ वरून १६,८२९ इतकी उरली आहे.
यासाठी परवाना हवा
खासगी संस्था वा एनजीओंना परदेशी निधी मिळवण्यासाठी एफसीआरए रजिस्ट्रेशन आवश्यक असते. एफसीआरए परवाना संपल्याचा अर्थ आता त्या परदेशी निधी मिळवू शकणार नाहीत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.