आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वाणिज्य मंत्रालयाने दिलेल्‍या माहितीनूसार:मॅन्युफॅक्चरिंगमधील परकीय गुंतवणूक 166 हजार कोटींवर

नवी दिल्ली6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

आर्थिक वर्ष २०२१-२२ दरम्यान मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्रात १६६ हजार कोटी रुपयांची प्रत्यक्ष परकीय गुंतवणूक (एफडीआय) झाली. वार्षिक आधारावर ७६% जास्त आहे. आर्थिक वर्षे २०२०-२१ मॅन्युफॅक्चरिंगमध्ये ९५ हजार कोटीची एफडीआय प्राप्त झाला हाेता. वाणिज्य मंत्रालयाने गुरुवारी जारी केलेल्या आकडेवारीनुसार, उत्पादन क्षेत्राला गेल्या आर्थिक वर्षात सिंगापूरमधून सर्वाधिक २७% एफडीआय प्राप्त झाला. अमेरिका या बाबतीत दुसऱ्या क्रमांकावर आहे, तिची भागीदारी १७.९४% राहिली. या बाबतीत मॉरिशस १६% शेअरसह तिसऱ्या स्थानावर आहे. याशिवाय नेदरलँड आणि स्वित्झर्लंडमधून भारतीय उत्पादन क्षेत्रात मोठी गुंतवणूक आली होती. कर्नाटकमध्ये सर्वात जास्त ३७.५५% एफडीआय प्राप्त झाला. २६.२६% एफडीआयसह महाराष्ट्र या बाबतीत दुसऱ्या आणि १३.९३% एफडीआयसह दिल्ली तिसऱ्या क्रमांकावर राहिली.

बातम्या आणखी आहेत...