आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Former Bihar DGP Gupteswar Pandey Enters JDU In The Presence Of Chief Minister Nitish Kumar

बिहार निवडणूक:बिहारचे माजी डीजीपी गुप्तेश्वर पांडे यांचा मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या उपस्थितीत जेडीयूमध्ये प्रवेश

पटनाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

बिहारचे माजी DGP गुप्तेश्वर पांडे यांनी रविवारी(दि.9) राज्यातील सत्ताधारी पक्ष असलेल्या जनता दल यूनाइडेड (JDU) मध्ये जाहीर प्रवेश केला आहे. गुप्तेश्वर पांडे यांचा पक्षप्रवेश मुख्यमंत्री नीतीश कुमार यांच्या निवासस्थानी झाला. राजकीय इनिंग सुरू करण्यासाठी पांडे यांनी काही दिवसांपूर्वीच डीजीपी पदाचा राजीनामा देत स्वेच्छा निवृत्ती (वीआरएस) घेतली होती. गुप्तेश्वर पांडे बक्सर जिल्ह्यातून निवडणूक लढवू शकतात.

शनिवारी देखील पांडे जेडीयू कार्यलयात गेले होते. यावेळी पांडेंनी मुख्यमंत्री नितीश कुमार यांची भेट घेतली होती. ही भेट पक्ष प्रवेशासाठी नाही तर नितीश कुमार यांचे आभार व्यक्त करण्यासाठी आल्याची प्रतिक्रिया त्यांनी भेटीनंतर दिली होती. मुख्यमंत्र्यांनी बिहारच्या डीजीपी पदावर असताना त्यांनी मला काम करण्याचे स्वातंत्र्य दिले. त्यामुळे त्यांना धन्यवाद देणे माझे कर्तव्य आहे, असं ते म्हणाले होते.