आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पक्षांतर:आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री किरण रेड्डी यांचा भाजपत प्रवेश

नवी दिल्ली2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री तथा काँग्रेसचे माजी नेते किरणकुमार रेड्डी यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यांनी शुक्रवारी नवी दिल्ली येथे केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांच्या उपस्थितीत भाजपचे सदस्यत्व घेतले. यादरम्यान रेड्डी यांनी संपूर्ण देशात पक्षाला नुकसान पोहोचवल्याबद्दल काँग्रेस नेतृत्वावर टीका केली. रेड्डी म्हणाले, ‘माझा राजा खूप बुद्धिमान आहे. ते स्वत:बद्दल विचार करत नाहीत व कुणाचा सल्लाही ऐकून घेत नाहीत.’ त्यांचा रोख गांधी-नेहरू कुटुंबीयांवर होता. पंतप्रधान मोदींचे कौतुक करत ते म्हणाले, भाजपच्या नेतृत्वाचे विचार स्पष्ट आहेत. धाडसी निर्णय घेणे सरकारची ओळख आहे. तथापि, रेड्डींच्या प्रवेशाने आंध्र प्रदेशात भाजप बळकट होईल, अशा विश्वास जोशी यांनी व्यक्त केला.

विभाजनाला केला विरोध
२०१४ मध्ये आंध्र प्रदेशचे विभाजन होऊन तेलंगण स्वतंत्र राज्य झाले. त्या वेळी रेड्डी आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री होते. विभाजनाच्या विरोधात त्यांनी काँग्रेस सोडली व स्वतंत्र पक्ष स्थापन केला. त्यानंतर २०१८ मध्ये ते पुन्हा काँग्रेसमध्ये परतले होते.