आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Former Chief Minister Of Jammu And Kashmir Mehbooba Mufti Fell Alone, Accompanied By Several Leaders; Crisis Since He Became The Chief Minister On 19 June 2018 News And Updatesa

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

श्रीनगर:जम्मू-काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती पडल्या एकाकी, अनेक नेत्यांनी सोडली साथ; 19 जून 2018 ला मुख्यमंत्रिपद गेल्यापासून संकट

श्रीनगर20 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • 5 आॅगस्ट 2019 राेजी केंद्रातील भाजप सरकारने कलम 370 हटवले

जम्मू-काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांचे चांगले दिवस जणू सरल्यासारखे दिसतात. कारण, त्यांच्या पक्षातील अनेक दिग्गज नेते त्यांना साेडून निघून गेले. त्यामुळे त्या एकाकी पडल्या आहेत. पक्ष साेडणाऱ्यांत वरिष्ठ नेते, माजी कॅबिनेट मंत्री व माजी आमदारांचा समावेश आहे. काही नेते पक्ष साेडण्याच्या तयारीत आहेत. मुख्यमंत्री असताना मेहबूबा यांनी २८ जुलै २०१७ राेजी पहिल्यांदाच जाहीरपणे लक्ष्मणरेषा आेलांडली हाेती. तेव्हा त्या म्हणाल्या, जम्मू-काश्मीरचा विशेष दर्जा संपुष्टात आणल्यास किंवा स्थायी निवास अधिनियम (३५-ए) हटवल्यास खाेऱ्यात भारतीय ध्वज घेणारा काेणीही नसेल. मात्र आता पक्षाचा झेंडा साेपवण्यासाठी मेहबूबा आज स्वकीयांमध्ये नेता शाेधू लागल्या आहेत.

चार वर्षांतच त्यांची ही अवस्था झालीये. पीडीपीचे सर्वात वरिष्ठ नेते व संस्थापक मुजफ्फर हुसेन बेगदेखील अलीकडेच पक्ष साेडून सज्जाद लाेन यांच्या पीपल्स काॅन्फरन्समध्ये सामील झाले. बेग यांची पत्नी सफिना बेगदेखील पीडीपीतून राजीनामा देण्याच्या तयारीत आहेत. पीडीपीचे प्रवक्ते फिरदाेस टाक यांनी एक आराेप केला आहे. पीडीपी नेत्यांना तुरुंगात जावे लागेल, असे वातावरण केंद्राने तयार केले आहे. माजी मंत्री नईम अख्तर, माजी उपाध्यक्ष सरताज मदनी यांनाही याच कारणामुळे तुरुंगात जावे लागले. छळ हाेण्याच्या भीतीने अनेकांनी पक्ष साेडला. जनतेची दिशाभूल करणारी पीडीपी संपुष्टात आली आहे.

१९ जून २०१८ ला मुख्यमंत्रिपद गेल्यापासून संकट
पीडीपी संस्थापक मुफ्ती माेहंमद सईद यांच्या मृत्यूनंतर खूप मन वळवल्यानंतर मेहबूबा भाजपसाेबत सरकार स्थापन करण्यास तयार झाली हाेती. ४ एप्रिल २०१६ राेजी त्या मुख्यमंत्री झाल्या. ही आघाडी जास्त दिवस चालली नाही. १९ जून २०१८ राेजी भाजपने आघाडी ताेडली. राज्या राष्ट्रपती राजवट लागू केली. ५ आॅगस्ट २०१९ राेजी केंद्रातील भाजप सरकारने कलम ३७० हटवले. मेहबूबा मुफ्ती नजरबंद झाल्या. १४ महिन्यांनंतर त्या १३ आॅक्टाेबर २०२० त्यांची सुटका झाली. तेव्हापासून त्या पक्षाला वाचवण्यासाठी संघर्ष करत आहेत. परंतु आता त्यांना साथ देण्यासाठी महत्त्वाचे नेते राहिलेले नाहीत.

बातम्या आणखी आहेत...