आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
कृषी कायद्याच्या निषेधार्थ दिल्ली-हरियाणा सीमेवर शेतकरी आंदोलनाचा आज आठवा दिवस आहे. शेतकरी सरकारबरोबर चर्चाही करीत आहेत. दरम्यान, पंजाबचे माजी मुख्यमंत्री आणि अकाली दलाचे नेते प्रकाशसिंग बादल(92) यांनी शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ पद्मविभूषण परत केला आहे. बादल यांना हा पुरस्कार 2015 मध्ये मिळाला होता. बादल यांचा पक्ष, शिरोमणी अकाली दल, 22 वर्ष एनडीएसोबत होता, पण त्यांनी शेती कायद्याच्या निषेधार्थ सप्टेंबरमध्ये एनडीएमध्ये वेगळे होण्याचा निर्णय घेतला होता. यापूर्वी 17 सप्टेंबरला हरसिमरत कौर बादल यांनीही मोदी मंत्रिमंडळातून राजीनामा दिला होता.
काय म्हणाले प्रकाश सिंह बादल
आपला पद्मविभूषण सन्मान परत करत असताना पंजाबचे माजी मुख्यमंत्री प्रकाशसिंह बादल म्हणाले, 'मी एवढा गरीब आहे की, शेतकऱ्यांसाठी अर्पण करण्याला माझ्याकडे काहीच नाही. मी जो काही आहे तो या शेतकऱ्यांमुळेच आहे. अशात जर शेतकऱ्यांचा अपमान होत असेल, तर कोणत्याही प्रकारचा सन्मान राखून ठेवण्यात अर्थ नाही.' तसेच शेतकऱ्यांची फसवणूक करण्यात आल्याचेही ते म्हणाले. शेतकऱ्यांना मोठे दुःख झालेय. त्यांच्या आंदोलनाला चुकीच्या पद्धतीने सादर केले जातेय हे अतिशय दुःखद असल्याचेही बादल म्हणाले.
शेतकऱ्यांची सरकारसोबत चर्चा सुरू
तिकडे 40 नेत्यांची सरकारसोबत विज्ञान भवनात बातचित सुरू आहे. सरकारकडून कृषी मंत्री नरेंद्र तोमर अध्यक्षता करत आहेत. मीटिंगपूर्वी तोमर यांनी म्हटले की, चर्चेचा सकारात्मक परिणाम होईल. दुसरीकडे गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतल्यानंतर पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह म्हणाले की, त्यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर लवकरात लवकर तोडगा काढावा असे आवाहन त्यांनी गृहमंत्र्यांना केले आहे. या मुद्द्यांमुळे पंजाबची अर्थव्यवस्था व देशाच्या सुरक्षेवर परिणाम होत आहे. हे प्रकरण लवकरच मार्गी लावण्याचे आवाहनही त्यांनी शेतकऱ्यांनाही केले आहे.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.