आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Former Congress President Rahul Gandhi Questions On Narendra Modi Government Over India China Ladakh Border Clash

गलवान खोऱ्याविषयी राहुल गांधींचे मोदींना 3 प्रश्न:चीन आपल्या भूभागात 20 निशस्त्र जवानांच्या हत्येला योग्य कसे काय ठरवत आहे? सीमेवर यथास्थिती कायम राखण्यासाठी दबाव का टाकण्यात आला नाही?

नवी दिल्लीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी म्हणाले - राष्ट्रहित सर्वोपरि आहे, याच्या संरक्षणाची जबाबदारी सरकारची आहे
  • काँग्रेस सातत्याने चीनसोबतच्या सीमावादावरुन भारत सरकारला लक्ष्य करत आहे, भाजप म्हणते की - राहुल गांधींचे वर्तवण बेजबाबदार आहे

भारत-चीन वादावरून कॉंग्रेस नेते राहुल गांधी सतत सरकारवर हल्ला करत आहेत. लडाखमध्ये चिनी सैन्याने घेतलेली माघार आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांच्या चिनी परराष्ट्रमंत्री वांग यी यांच्याशी झालेल्या चर्चेविषयी राहुल गांधींनी केंद्र सरकारवर 3 प्रश्न उपस्थित केले आहेत. 

त्यांनी विचारले की सीमेवर यथास्थिती कायम राखण्यासाठी दबाव का टाकण्यात आला नाही? दुसरे म्हणजे, चीन आपल्या भूभागात 20 निशस्त्र जवानाच्या हत्येला योग्य कसे काय ठरवत आहे?  तिसरे म्हणजे गलवान खोऱ्यात आपल्या प्रादेशिक सार्वभौमत्वाचा उल्लेख का नाही? राहुल यांनी ट्वीट करून भारत आणि चीनच्या सरकारांची निवेदने शेअर केली आहेत. त्यांनी लिहिले की राष्ट्रीय हित सर्वोपरि आहे. त्याचे संरक्षण करण्याची जबाबदारी भारत सरकारची आहे.

डोभाल आणि वांग यी यांच्यात दोन तास झाली चर्चा

सोमवारी अशी बातमी आली की चीनने गॅलवान कोऱ्यात दोन किलोमीटर अंतरावर सैन्य मागे घेतले आहे. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (एनएसए) अजित डोभाल यांनी चीनचे परराष्ट्रमंत्री वांग यी यांच्यासोबत व्हिडिओ कॉलवर दोन तास चर्चा केली. रविवारी झालेल्या या संभाषणानंतर काही तासांनंतर चीनने सैन्य पुन्हा बोलावण्याचा निर्णय घेतला, त्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लडाखला भेट दिली होती.

राहुल म्हणाले होते-कोरोना, नोटाबंदी, जीएसटीचे अपयश हे  हार्वर्डसाठी अभ्यास 

सोमवारी कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनीही सरकारच्या धोरणांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. कोविड 19, नोटाबंदी आणि जीएसटी या प्रकरणात सरकारचे अपयश भविष्यात हार्वर्ड बिझिनेस स्कूलसाठी केस स्टडी ठरणार असल्याचे राहुल यांनी ट्विट केले. यापूर्वी, त्यांनी लॉकडाउनचे धोरण अपयशी ठरल्याचे वारंवार सांगितले आहे.

0