आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोरोनाचा कहर:माजी क्रिकेटपटू चेतन चाैहान यांचे निधन, उत्तर प्रदेशात काेराेनामुळे मृत्युमुखी पडलेले दुसरे मंत्री

नवी दिल्ली/ लखनऊएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • गावसकरसोबत सलामीला 10 वेळा शतकी भागीदारी

माजी क्रिकेटपटू आणि उत्तर प्रदेशचे कॅबिनेट मंत्री चेतन चौहान यांचे निधन झाले. कोरोना संसर्गानंतर १२ जुलैपासून येथील रुग्णालयात त्यांना दाखल केले होते. या दरम्यान, मूत्रपिंडात संसर्ग वाढला आणि त्यांना हरियाणातील गुरुग्रामच्या मेदांता रुग्णालयात हलवण्यात आले. तिथे त्यांना ३६ तास जीवनरक्षक प्रणालीवर ठेवण्यात आले होते. अर्जुन पुरस्काराने सन्मानित चौहान १९९१ ते १९९८ पर्यंत खासदार होते. भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर ते यूपी सरकारमध्ये सैनिक कल्याण, होमगार्ड्‌स, राज्य सुरक्षा दल आणि नागरी सुरक्षा मंत्री होते. त्यांनी टीम इंडियासाठी १९६९ ते १९७८ दरम्यान ४० कसोटी सामने खेळले. यादरम्यान त्यांनी ३१.५७ च्या सरासरीने २०८४ धावा काढल्या. त्यांची ९७ धावांची सर्वोत्कृष्ट खेळी ठरली. ७ एकदिवसीय सामन्यांत १५३ धावा काढल्या. चौहान कोरोनामुळे निधन झालेले राज्यातील दुसरे मंत्री आहेत.

गावसकरसोबत सलामीला १० वेळा शतकी भागीदारी

७३ वर्षीय चौहान यांनी सलामीचे फलंदाज म्हणून सुनील गावसकरसोबत फलंदाजी केली. दोघांची जोडी बरीच यशस्वी ठरली. दोघांनी १९७० च्या दशकात १० वेळा शतकी भागीदारी केली आणि मिळून तीन हजारांहून अधिक धावा चोपल्या. चौहान यांनी देशांतर्गत क्रिकेटमध्ये दिल्ली आणि महाराष्ट्राकडून खेळताना बऱ्याच धावा काढल्या.

बातम्या आणखी आहेत...