आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ब्रेकिंग न्यूज:माजी क्रिकेटर आणि यूपी सरकारमधील मंत्री चेतन चौहान यांचा मृत्यू, मागच्या महिन्यात झाली होती कोरोनाची लागण

लखनऊएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • चेतन चौहान यांनी 1969 ते 1978 दरम्यान 40 कसोटी सामन्यात 2,084 धावा केल्या आहेत
  • भाजप आमदार चेतन चौहान सध्या उत्तर प्रदेश सरकारमध्ये होमगार्ड मंत्री होते

माजी क्रिकेटर आणि उत्तर प्रदेश सरकारमधील मंत्री चेतन चौहान (73) यांचे रविवारी निधन झाले. कोरोना संक्रमित झाल्यानंतर त्यांना गुरुग्रामधील मेदांता हॉस्पीटलमध्ये भरती करण्यात आले होते. मागच्या महिन्यात त्यांना कोरोनाची लागण झाली होती. उत्तर प्रदेश मंत्रीमंडळात चौहान यांच्याकडे सैनिक कल्याण, होमगार्ड, पीआरडी आणि नागरी सुरक्षा मंत्रालयाची जबाबदारी होती. चौहान यापूर्वी दोनवेळा खासदारही झाले होते. कोरोनामुळे आतापर्यंत यूपी सरकारमधील दोन मंत्र्यांचा मृत्यू झाला आहे. याआधी 2 ऑगस्टला मंत्री कमला रानी वरुण यांचेही कोरोनामुळे निधन झाले.

मुख्यमंत्री योगी अदित्यनाथ यांचे ट्वीट

कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर चेतन चौहान यांना किडनी आणि ब्लड प्रेशरचा त्रास सुरू झाला होता. यानंतर त्यांना गुरुग्रामच्या मेदांता हॉस्पीटलमध्ये शिफ्ट करण्यात आले होते. यादरम्यान दोनवेळा त्यंची रिपोर्ट निगेटिव्ह आली आणि तिसरी रिपोर्ट पॉझिटिव्ह आली.

यूपी सरकारमधील अनेक मंत्री पॉझिटिव्ह

उत्तर प्रदेशमध्ये आतापर्यंत क्रिडा मंत्री उपेंद्र तिवारी, जेल मंत्री जय प्रताप सिंह, राजेंद्र प्रताप सिंह, धर्म सिंह सैनी, कॅबिनेट मंत्री मोती सिंह आणि महेंद्र सिंह कोरोनातून ठीक झाले आहेत. याशिवाय बीजेपी प्रदेशाध्यक्ष स्वतंत्र देव सिंह यांनाही कोरोनाची लागण झाली आहे.

40 कसोटीमध्ये 2,084 धावा काढल्या

चेतन चौहान यांनी टीम इंडियासाठी 1969 ते 1978 दरम्यान 40 कसोटी सामने खेळले होते. यात त्यांनी 31.54 च्या सरासरीने 2084 धावा काढल्या . त्यांचा बेस्ट स्कोर 97 रन होता. चेतन यांनी 7 वनडेमध्ये 153 रन काढले आहेत. चौहान आणि सुनील गावस्कर यांची ओपनिंग जोडी 1970 च्या दशकात खूप लोकप्रिय होती. दोघांनी मिळून 10 शतकी भागीदारी केली आणि 3 हजारांपेक्षा जास्त धावा केल्या आहेत.

बातम्या आणखी आहेत...