आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Former Cricketer Mohammad Azharuddin Car Accident News And Update | Mohammad Azharuddin In Rajasthan Ranthambore National Park

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

माजी क्रिकेटर थोडक्यात बचावले:कुटुंबासह रणथंभौरला फिरायला गेलेले भारतीय संघाचे माजी कर्णधार मोहम्मद अझरुद्दीन यांच्या गाडीचा अपघात

सवाईमाधोपूर4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • सवाईमाधोपूरच्या सूरवालजवळ झाला अपघात, अपघातात रस्त्या शेजारी थांबलेला तरुण जखमी झाला

आपल्या कुटुंबासह रणथंभौरला फिरायला गेलेले माजी क्रिकेटर मोहम्मद अझहरूद्दीन यांच्या कारचा बुधवारी भीषण अपघात झाला. या अपघातात रस्त्या शेजारी थांबलेला एक तरुण जखमी झाला आहे. या अपघातात अझहरूद्दीन आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्य थोडक्यात बचावले आहेत. अपघात इतका भीषण होता की, गाडीचा अक्षरशः चुराडा झाला.

मिळालेल्या माहितीनुसार अझहरूद्दीन आपल्या कुटुंबासह सवाईमाधोपूरला आले आहेत. येथील फूल मोहम्मद चौकात चालकाचे करावरून नियंत्रण सुटल्यामुळे कार पलटली. अपघातात रस्त्याच्या शेजारी थांबलेला एक तरुण जखमी झाला आहे. सूचना मिळताच, डीएसपी नारायण तिवारी घटनास्थळी दाखल झाले. जखमी तरुणाला रुग्णालयात नेले. तसेच, अझहरूद्दीन आणि त्यांच्या कुटुंबाला जवळच्या एका हॉटेलमध्ये नेण्यात आले आहे.

बातम्या आणखी आहेत...