आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Former Gujarat Chief Minister Keshubhai Patel Has Died Of A Heart Attack At The Age Of 92 News And Updates

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

निधन:गुजरातचे माजी मुख्यमंत्री केशुभाई पटे यांचे निधन; दोन वेळा मुख्यमंत्री बनले, पण कार्यकाळ पूर्ण करू शकले नाही

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • केशुभाई पटेल यांचे हृदयविकाराच्या झटक्याने वयाच्या 92 वर्षी निधन झाले

गुजरातचे माजी मुख्यमंत्री केशुभाई पटेल यांचे वयाच्या 92 व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांनी दोन वेळा गुजरातचे मुख्यमंत्रीपद भूषवले होते. केशुभाई यांची 30 सप्टेंबर रोजी सोमनाथ मंदिर ट्रस्टच्या अध्यक्षपदी पुन्हा निवड झाली होती.

दोन्ही वेळा मुख्यमंत्रीपदाचा कार्यकाळ पूर्ण करू शकले नाही

बंडखोरीमुळे केशूभाईंना दोन्ही वेळा मुख्यमंत्र्यांचा कार्यकाळ पूर्ण करता आला नाही. 2001 मध्ये त्यांच्या जागी नरेंद्र मोदी यांनी CM पदाची शपथ घेतली होती. मोदी त्यांना आपला राजकीय गुरू देखील मानतात. पंतप्रधान झाल्यावर ते म्हणाले होते की राज्याची खरी कमांड केशुभाईंच्या ताब्यात आहे आणि ते भाजपच्या रथाचे सारथी आहेत.

राजकीय प्रवास

केशुभाई पटेल यांनी 1960 च्या दशकात जनसंघ कार्यकर्त्यांच्या रुपात सुरुवात केली होती. ते जनसंघ संस्थापक सदस्यांमध्ये होते. 1975 मध्ये जनसंघ-काँग्रेस (ओ) महाविकास आघाडी सरकार गुजरातमध्ये सत्तेत आले. आणीबाणीनंतर 1977 मध्ये केशुभाई पटले राजकोटमधून लोकसभेसाठी निवडले गेले. नंतर त्यांनी राजीनामा दिली आणि बाबूभाई पटेलच्या जनता मोर्चा सरकारमध्ये 1978 ते 1980 पर्यंत कृषीमंत्री राहिले. 1979 सालच्या मोरबीला उद्ध्वस्त करणाऱ्या मच्छू धरण दुर्घटनेनंतर ते मदतकार्यात सहभागी झाले होते.

केशुभाई पटेल 1978 आणि 1995 दरम्यान कलावाड, गोंडल आणि विशावादार येथून विधानसभेत निवडून गेले. 1980 मध्ये जनसंघ पक्षाचे विघटन झाले, तेव्हा ते भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ संयोजक झाले. त्यांनी इंडियन नॅशनल कॉंग्रेसविरोधात निवडणूक मोहीम आयोजित केली आणि त्यांच्या नेतृत्वात भाजपला 1995 च्या विधानसभा निवडणुकीत विजय मिळाला होता.