आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

क्लीन चिट लाचखोरी प्रकरण:माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या वकिलास अटक; दोन दिवसांची कोठडी

नवी दिल्ली21 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

माजी गृहमंत्री तथा राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख यांचा वकील आनंद डागा आणि केंद्रीय अन्वेषण विभागाचा (सीबीआय) लाचखोर उपनिरीक्षक अभिषेक तिवारी यांना सीबीआय विशेष न्यायालयाने दोन दिवसांची कोठडी सुनावली.

१०० कोटींच्या वसुली प्रकरणात सीबीआयने प्राथमिक चौकशीत देशमुख यांना क्लीन चिट दिल्याचा अहवाल उपनिरीक्षक तिवारीने फोडला होता. यासाठी लाच देणारा देशमुखांचा वकील आनंद डागा आणि तिवारी या दोघांनाही बुधवारी रात्री सीबीआयने अटक केली. या दोघांना दिल्लीच्या रोझ अॅव्हेन्यू न्यायालयात हजर केले. त्यानंतर चौकशी करण्यासाठी सीबीआयचे विशेष न्यायाधीश विमलकुमार यांनी दोन दिवसांची कोठडी मंजूर केली. मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सीबीआयने देशमुख यांची चौकशी सुरू केली आहे. या चौकशीच्या कामात ढवळाढवळ करण्याचा आरोप वकिलावर आहे.

बातम्या आणखी आहेत...