आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करादिल्लीच्या फिरोजशाह कोटला स्टेडियमणध्ये अरुण जेटली यांची मूर्ती लावण्यावरुन माजी गोलंदाज बिशन सिंह बेदी नाराज आहेत. या निर्णयामुळे त्यांनी दिल्ली डिस्ट्रिक्ट क्रिकेट असोसिएशन (DDCA) मधून फारकत घेतली आहे. बेदी यांचे म्हणने आहे की, जेटलींच्या आजुबाजूला चाटुगिरी करणारे असायचे. ते एक चांगले नेते होते, पण एका गूगल सर्चवर कळेल की, त्यांच्या काळात DDCA मध्ये किती भ्रष्टाचार झाला. अपयश विसरले जातात, अशा प्रकारे पुतळा उभा करुन अपयश साजरे होत नाहीत.
भारतासाठी 67 कसोटी सामन्यांमध्ये 266 विकेट घेतलेल्या बेदींनी जेटली यांचे पुत्र आणि विद्यमान DDCA अध्यक्ष रोहन जेटली यांना पत्र लिहून या सर्व गोष्टी सांगितल्या. तसेच, त्यांनी कोटला स्टेडियममधून आपल्या नावाचे स्टँड हटवण्याची मागणी केली आहे. बेदींनी तेव्हा लिहीले आहे, जेव्हा 28 डिसेंबरला अरुण जेटलींच्या जयंती निमित्त त्यांची मुर्ती कोटला स्टेडियममध्ये लावली जाणार आहे. 700 किलोग्राम वजनी या मूर्तीला अहमदाबादमध्ये बनवले असून, एअरलिफ्ट करुन ही मुर्ती दिल्लीत आणली जाईल.
जेटली 14 वर्षे DDCA अध्यक्ष होते
या स्टेडियममध्ये जेटली यांची 6 फूट उंच मूर्ती लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री राहिलेले जेटली 1999 ते 2013 पर्यंत DDCA चे अध्यक्ष होते. त्यांच्यानंतर रजत शर्मा DDCA प्रेसिडेंट बनले. त्यांनी राजीनामा दिल्यानंतर जेटलींचे पुत्र रोहन यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.