आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Former Minister Vyas Out Of BJP And Congress; Winds Of Defection In BJP Congress | Marathi News

गुजरात निवडणूक 2022:माजी मंत्री भाजपतून तर काँग्रेसमधून व्यास बाहेर ; भाजप-काँग्रेसमध्ये पक्षांतराचे वारे

अहमदाबाद24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

गुजरात विधानसभा निवडणुकीपूर्वी माजी मंत्री व चार वेळचे आमदार जयनारायण व्यास यांनी भाजपला सोडचिठ्ठी दिली आहे. माजी आरोग्यमंत्री व्यास म्हणाले, भाजपमध्ये मी त्रस्त होतो. सिद्धपूरमधून व्यास यांनी सात वेळा निवडणूक लढवली. २०१७ मध्ये ते पराभूत झाले होते. ते काँग्रेस किंवा आपमध्ये सामील होऊ शकतात. काँग्रेस ओव्हरसीजचे प्रभारी सचिव हिमांशू व्यास काँग्रेसचा राजीनामा देऊन भाजपमध्ये गेेले आहेत. आम आदमी पार्टीतून काँग्रेसमध्ये दाखल झालेले इंद्रनील राजगुरू म्हणाले, आपचे उमेदवार भाजप निश्चित करत आहे. भाजपचा विजय सुकर होण्यासाठी हे केले जात आहे. १ ऑक्टोबरला केजरीवाल व मुख्यमंत्री मान राजकोटला आले होते. ते विमानातून मोठी रोकड घेऊन आले होते, असा आरोपही त्यांनी केला. या वेळी आपने शनिवारी आणखी २१ उमेदवारांची यादी जाहीर केली. पक्षाची ही ११वी यादी आहे. आपने आतापर्यंत एकूण १३९ उमेदवार जाहीर केले आहेत. राज्यात दोन टप्प्यांत १ व ५ डिसेंबरला मतदान होणार आहे.

निवडणूक लढवू नये असा प्रस्ताव : केजरीवाल
आपचे संयोजक व दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी एक दावा केला आहे. भाजपने केजरीवाल यांना गुजरात निवडणूक लढवू नये, असा प्रस्ताव दिला होता. निवडणूक लढवू नका. सत्येंद्र जैन, सिसोदिया यांना सोडले जाईल. केजरीवाल यांची साथ सोडावी. तुम्हाला सीएम करू असे सीबीआयने मनीष सिसोदियांना सांगितले होते. परंतु त्यांना हा प्रस्ताव फेटाळला, असा दावाही केजरीवाल यांनी केला.

बातम्या आणखी आहेत...