आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Former Nagaland Governor, CBI Chief And Ex DGP Of Himachal Pradesh Ashwani Kumar Committed Suicide In His House

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

माजी सीबीआय प्रमुखाची आत्महत्या:हिमाचल प्रदेशचे माजी डीजीपी आणि नागालँड-मणिपूरचे माजी राज्यपाल अश्विनी कुमार यांनी घेतला गळफास

7 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

माजी सीबीआय चीफ आणि हिमाचलचे माजी डीजीपी अश्विनी कुमार यांनी बुधवारी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. रिपोर्टनुसार, त्यांनी शिमलामधील राहत्या घरात आत्महत्या केली. मागील काही दिवसांपासून तणावात असल्याची माहिती आहे.।

शिमलाचे एसपी मोहित चावला यांनी या घटनेची माहिती दिली. तसेच, खूप मोठा धक्का असल्याचेही म्हटले आहे. चावला म्हणाले की, पोलिस अधिकाऱ्यांसाठी अश्विनी कुमार रोल मॉडल होते.

2008 मध्ये सीबीआयचे चीफ बनले होते

अश्विनी कुमार ऑगस्ट 2006 ते जुलै 2008 पर्यंत ते हिमाचल प्रदेशचे डीजीपी होते. 2 ऑगस्ट 2008 पासून 30 नोव्हेंबर 2010 पर्यंत सेंट्रल ब्यूरो ऑफ इन्वेस्टिगेशन (सीबीआय) चे चीफ म्हणून काम केले. त्यादरम्यान अमित शाह यांना शोहराबुद्दीन शेख प्रकरणात अटक केले होते. मार्च 2013 ते जून 2014 पर्यंत नागालँडचे राज्यपाल होते. 2013 मध्ये काही काळासाठी मणिपूरचेही राज्यपाल राहिले.

बातम्या आणखी आहेत...