आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नवी दिल्ली:पुढील वाट 1991 च्या आर्थिक संकटापेक्षाही आव्हानात्मक, उदारीकरणाची 30 वर्षपूर्ती कार्यक्रमात बोलले माजी पंतप्रधान

नवी दिल्ली3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

देशात उदारीकरणाची प्रक्रिया सुरू होऊन ३० वर्षे पूर्ण झाली आहेत. या प्रसंगी माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी शुक्रवारी म्हटले की, पुढील वाटचाल १९९० च्या दशकाच्या आर्थिक संकटापेक्षाही आव्हानात्मक आहे. त्यामुळे सर्वच भारतीयांनी आपले जीवन सन्मानजनक होण्यासाठी पुन्हा एकदा आपल्या प्राथमिक गरजा तपासण्याची गरज निर्माण झाली आहे.

डॉ. मनमोहन सिंग यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रात म्हटले की, ‘आज रोजी ३० वर्षांपूर्वी १९९१ मध्ये काँग्रेस पक्षाने भारतीय अर्थव्यवस्थेत महत्त्वाच्या सुधारणांना सुरुवात केली होती. देशाच्या आर्थिक धोरणासाठी नवा मार्ग मोकळा केला होता.

मनमोहन सिंग यांनी सांगितले की, १९९१ मध्ये अर्थमंत्री म्हणून त्यांनी व्हिक्टर ह्युगो यांच्या कथनासह आपले अर्थसंकल्पीय भाषण संपवले होते. यात त्यांनी म्हटले होते की, ‘पृथ्वीवर कोणतीच शक्ती कोणाचे विचार रोखू शकत नाही, ज्याची वेळ आलेली आहे.’ आज आम्हाला ३० वर्षांनंतर एक राष्ट्र म्हणून रॉबर्ट फ्रॉस्ट यांची कविता लक्षात ठेवली पाहिजे, ‘पण मी पाळले जातील अशीच आश्वासने दिली आहेत, झोपण्यापूर्वी लाखो मैल पुढे जायचे आहे. ’

बातम्या आणखी आहेत...