आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

निधन:माजी राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम यांच्या मोठ्या भावाचे वृद्धापकाळाने निधन; वयाच्या 104 व्या वर्षी राहत्या घरी घेतला अखेरचा श्वास

नवी दिल्लीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • वृद्धापकाळामध्ये मोहम्मद हे अनेक आजारांचा सामना करत होते.

माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचे मोठे बंधू मोहम्मद मुथू मीरा लेब्बई मरैकयार यांचे निधन झाले आहे. तामिळनाडूतल्या रामेश्वरममध्ये राहत्या घरी त्यांची प्राणज्योत मालवली. ते 104 वर्षांचे होते. वृद्धापकाळामध्ये मोहम्मद हे अनेक आजारांचा सामना करत होते. दरम्यान रविवारी संध्याकाळी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

माजी राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम यांनी यापूर्वी जगाचा निरोप घेतला आहे. मेघालयातील शिलाँग येथे 27 जुलै 2015 रोजी त्यांचे निधन झाले होते. दरम्यान आता त्यांचे मोठे भाऊ मोहम्मत यांचे निधन झाले आहे. दरम्यान मोहम्मद आणि अब्दुल कलाम यांच्यासह त्यांच्या कुटुंबाची परिस्थिती अतिशय हलाखीची होती. अब्दुल कलाम यांचे वडील नाविक म्हणून काम करायचे. त्यांचे शिक्षणही कमी होते. ते मच्छीमारांना बोट भाड्याने देऊन त्यांचे गुजराण होत होते. अब्दुल कलाम यांचे बालपण दारिद्र्य आणि संघर्षातून गेले. पाच भाऊ आणि पाच बहिणींचे कुटुंब चालवत असताना त्याच्या वडिलांना अनेक आर्थिक संकटांचा सामना करावा लागला.

बातम्या आणखी आहेत...