आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Former Prime Minister Manmohan Singh Admitted To Hospital, He Is Stable According To Hospital Sources

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

प्रकृती स्थिर:माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांची प्रकृती आता स्थिर, नवीन औषधींमुळे झाली होती रिअॅक्शन; रुग्णालय सूत्रांची माहिती

नवी दिल्लीएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री अजित जोगी यांची प्रकृती चिंताजनक

माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांची प्रकृती आता स्थिर असल्याची माहिती एम्स रुग्णालयातील सूत्रांकडून सोमवारी देण्यात आली आहे. त्यांना नवीन औषधीमुळे रिअॅक्शन झाल्याने अस्वस्थता झाली होती असे सांगितले जात आहे. मनमोहन सिंग यांना याच समस्येमुळे रविवारी रात्री 9 च्या सुमारास एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्यावर डॉ. नितीश नाइक उपचार करत आहे. सिंग यांना औषधींमुळे नेमकी काय रिअॅक्शन झाली याचा सविस्तर तपास सध्या केला जात आहे.

87 वर्षीय काँग्रेस नेते यांना रिअॅक्शनमुळे छातीत वेदना आणि ताप या लक्षणांसह रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. सुत्रांच्या माहितीनुसार, त्यांना आलेल्या तापीचे नेमके कारण शोधण्यासाठी विविध प्रकारच्या चाचण्या घेतल्या जात आहेत. या दरम्यान त्यांची योग्य ती काळजी घेतली जात आहे. सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे. तसेच हृदयविकार तज्ज्ञ डॉक्टरांची टीम सुद्धा त्यांच्या चाचण्या घेत आहे. त्यांना अतीदक्षतेखाली ठेवण्यात आले आहे. सिंग सध्या राजस्थान येथून राज्यसभा खासदार आहेत. 2004 पासून 2014 पर्यंत पंतप्रधान पद भूषविणारे सिंग यांच्यावर 2009 मध्ये एम्स रुग्णालयातच कोरोनरी बायपास सर्जरी पार पडली होती. काँग्रेससह जवळपास सर्वच पक्षांच्या नेत्यांच्या त्यांच्या लवकर बरे होण्याची कामना केली आहे.

रायपूर : शनिवारी रुग्णालयात दाखल करण्यात आलेले छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री अजित जोगी (७४) यांची प्रकृती चिंताजनक आहे. 

बातम्या आणखी आहेत...