आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Former Prime Minister Of India Dr. Manmohan Singh Infected With Corona, Admitted To AIIMS

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

नेत्यांना कोरोना:भारताचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांना कोरोनाची लागण, एम्समध्ये दाखल

नवी दिल्ली19 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • नुकतच मनमोहन सिंग यांनी कोरोना परिस्थितीवर चंता व्यक्त करत नरेंद्र मोदींना पत्र लिहीले होते

भारताचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांना कोरोनाची लागण झाली आहे. कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांना दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

एएनआय या वृत्तसंस्थेने मनमोहन सिंग यांना कोरोना झाल्याची माहिती दिली आहे. नुकतच मनमोहन सिंग यांनी देशातील महामारीच्या स्थितीबद्दल चिंता व्यक्त केली होती. याबाबत त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्रही लिहिले होतं.

मनमोहन सिंगांनी कोरोनाशी लढण्यासाठी केंद्राला दिले होते 5 प्रस्ताव

काेराेना संसर्गाने देशभरात हाहाकार उडवलेला असतानाच माजी पंतप्रधान मनमाेहन सिंग यांनी पंतप्रधान नरेंद्र माेदी यांना पत्र लिहून लसीकरणाचा वेग वाढवण्याचा प्रस्ताव दिला अाहे. कोरोनामुळे झालेल्या विध्वंसचा संदर्भ देताना माजी पंतप्रधानांनी लसीकरणासंदर्भात पाच सूचना दिल्या आहेत.45 वर्षांपेक्षा कमी वय असलेल्या लाेकांना लसीकरणामध्ये सूट दिली जावी असे या पत्रात मनमाेहन सिंग यांनी म्हटले अाहे.

माजी पंतप्रधान मनमोहन सिंग म्हणाले की, महामारी नियंत्रणात अाणण्याच्या दृष्टीने लसीकरण करणे महत्त्वाचे आहे. किती लोकांना लस दिली गेली आहे याच्या अाकडेवारीकडे लक्ष न देता किती टक्के लाेकांचे लसीकरण झाले यावर लक्ष केंद्रित करणे महत्त्वाचे असल्याकडे डाॅ. मनमाेहन सिंग यांंनी लक्ष वेधले अाहे. हा आकडा न पाहता लाेकसंख्येपैकी अापण किती टक्के लोकांचे लसीकरण केले यावर लक्ष केंद्रित केले पाहिजे. त्याचप्रमाणे मनमोहन सिंग म्हणाले की, पुढच्या सहा महिन्यांसाठी देण्यात अालेल्या लसींच्या ऑर्डरचे वितरण राज्यांना कशा प्रकारे करण्यात येणार अाहेत हेदेखील सरकारने स्पष्ट केले पाहिजे.

मनमोहन सिंग यांनी दिले हे प्रस्ताव
1. पुढील सहा महिन्यांत वितरणाचे अाश्वासन दिलेल्या विविध लस उत्पादकांनी कितीची अाॅर्डर दिली अाहे हे सरकारने सांगावे. आपल्याला लक्ष्य ठेवलेल्या संख्येनुसार लाेकांचे लसीकरण करायचे तर त्यादृष्टीने पुरेशी ऑर्डर आधीपासूनच दिली पाहिजे तरच उत्पादक वेळेवर लसीचा पुरवठा करू शकतील.

2. या संभाव्य लसींचे वितरण राज्यात कोणत्या पारदर्शक सूत्रानुसार केले जाईल याबातही सरकारने स्पष्टीकरण द्यावे. केंद्र सरकार आपत्कालीन गरजांसाठी १०% लस ठेवू शकते, परंतु परंतु उर्वरित राज्यांना मिळणे गरजेचे अाहे, जेणेकरून त्यादृष्टीने लसीकरणाची योजना आखता येईल.

3. फ्रंटलाइन वर्कर्सची श्रेणी निश्चित करण्यासाठी राज्यांना सूट देण्यात यावी, जेणेकरून त्यांचे वय ४५ वर्षांपेक्षा कमी असेल तरी लस देता येऊ शकेल. ४५ पेक्षा कमी वय असेल तरीही त्यांना लस देता येऊ शकते.

4. सार्वजनिक आरोग्यासाठी सध्याच्या आणीबाणीच्या काळात भारत सरकारने लसी उत्पादकांना मदत पुरवली पाहिजे, जेणेकरून ते उत्पादन क्षमता वेगाने वाढवू शकतील. यासाठी कंपन्यांना निधी आणि सवलत देण्यात यावी.

5. लसीचे स्थानिक पुरवठादार मर्यादित आहेत. त्यामुळे युरोपियन वैद्यकीय संस्था किंवा यूएसएफडीएने मंजूर केलेल्या कोणत्याही लसींना देशात आयात करण्यासाठी मंजुरी देणे आवश्यक आहे. आपत्कालीन परिस्थितीत ही सूट योग्य आहे.

बातम्या आणखी आहेत...