आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Former US President Wrote Rahul Gandhi Does Not Have The Ability Or Passion To Master The Subject

ओबामांच्या नरजेत राहुल गांधी चिंताग्रस्त:अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष म्हणाले - 'राहुल गांधींमध्ये विषयाचे मास्टर होण्याची योग्यता किंवा महत्वाकांक्षा नाही'

9 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • 'गरीबीपासून ते मोदींचा पंतप्रधानपर्यंतचा त्यांचा प्रवास असा आहे ज्यामध्ये भारताचा विकासाचा जोश आणि शक्यता दिसतात'

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबाना यांनी आपल्या मेमोइर (चरित्र) मध्ये भारताचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंह आणि काँग्रेस नेता राहुल गांधी यांचा उल्लेख केला आहे. ओबामा यांनी राहुल यांना चिंताग्रस्त असे लिहित म्हटले की, 'राहुल अशा विद्यार्थ्यासारखे आहे, जो शिक्षकाला इम्प्रेस करण्यासाठी उत्सुक असतो, पण विषयाचे मास्टर होण्याची योग्यता किंवा महत्वाकांक्षा त्यांच्यात नाही. ही राहुल गांधींची कमजोरी आहे.' ओबामा जेव्हा सत्तेत होते, तेव्हा राहुल गांधी काँग्रेसचे उपाध्यक्ष होते. ओबामा अखेरच्या वेळी डिसेंबर 2017 मध्ये भारतात आले होते, तेव्हा राहुल त्यांना भेटले होते. राहुल गांधी ट्विट करत म्हणाले होते की, ओबामांसोबतची भेट शानदार राहिली.

'मनमोहन सिंह शात आणि ईमानदार'
मनमोहन सिंह यांच्या कार्यकाळातील UPA सरकारच्या वेळी नोव्हेंबर 2009 मध्ये ओबाना आणि त्याच्या पत्नी मिशेल या भारतात आले होते. त्यावेळी मनमोहन सिंह आणि त्याच्या पत्नी गुरुशरण कौर यांनी ओबामा कुटुंबासाठी डिनर ठेवले होते. बराक ओबामा, अमेरिकेचे पहिले अफ्रीकी-अमेरिकी राष्ट्राध्यक्ष होते. ओबामा यांनी मनमोहन सिंह यांना शात आणि ईमानदार असे म्हटले आहे.

ओबामांच्या पुस्तकात सोनिया गांधींचाही उल्लेख
ओबामा यांनी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांचा उल्लेख करत लिहिले की, 'आपण चार्ली क्रिस्ट आणि राहम इमॅनुएल सारख्या पुरुषांच्या हॅसमनेसविषयी बोललो, पण एक दोन महिला वगळता महिलांच्या सुंदरतेची चर्चा केली नाही. जसे की, सोनिया गांधी.'

ओबामा यांच्या 768 पानांच्या पुस्तकात 'ए प्रोमिस्ड लँड' 17 नोव्हेंबरला रिलीज होणार आहे. द न्यूयॉर्क टाइम्सने याच्या काही भागांचा रिव्ह्यू पब्लिश केला आहे. ओबामा यांनी आपल्या पुस्तकामध्ये दुसऱ्या देशांच्या नेत्यांविषयीही लिहिले आहे. रशियाचे प्रेसिडेंट ब्लादिमीर पुतिन यांना शारीरिकरित्या साधारण म्हटले आहे. अमेरिकेचे प्रेसिडेंट इलेक्ट जो बायडेन यांविषयी लिहिले की, ते सज्जन, ईमानदार आणि प्रामाणिक आहेत. बायडेन यांना जर वाटले की, त्यांना महत्त्व मिळत नाहीये, तर ते क्रोधित होऊ शकतात, ही अशी क्वालिटी आहे, जी कोणत्याही तरुणासोबत डील करताना वातावरण बिघडवू शकते.

ओबामांनी मोदींची केली स्तुती
पंतप्रधान नरेंद्र मोदींना टाइम मॅगझीनने 2015 मध्ये 200 सर्वात प्रभावशाली लोकांच्या लिस्टमध्ये सामिल केले होते. त्यावेळी ओबामा यांनी टाइम मॅगझीनमध्ये लिहिलेल्या आर्टिकलमध्ये मोदींना भारताचे रिफॉर्मर-इन-चीफ संबोधले होते. ओबामांनी लिहिले होते की, गरीबीपासून ते पंतप्रधानपर्यंतचा त्यांचा प्रवास असा आहे ज्यामध्ये भारताचा विकासाचा जोश आणि शक्यता दिसतात.

केंद्रीय मंत्री गिरिराज सिंह म्हणाले- राहुल विदेशातही अपमान करुन घेतात

बातम्या आणखी आहेत...