आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

व्हिडिओ पोस्ट केल्याचा आरोप:चौघांवर गुन्हा, एक जण अटकेत, तामिळनाडूतील बिहारींवरील हल्ल्याचे प्रकरण

पाटणा15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

तामिळनाडूतील स्थलांतरित बिहारींवर झालेल्या हल्ल्यांशी संबंधित अफवा, दहशत पसरवणारे व्हिडिओ आणि पोस्ट सोशल मीडियावर टाकल्याच्या आरोपाखाली चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर एकास अटक केली आहे.

अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव अमनकुमार आहे. अमन हा जुमईचा राहणारा आहे. याशिवाय प्रयास न्यूजचे राकेश तिवारी, ट्विटर युजर युवराजसिंह राजपूत आणि यूट्यूब चॅनल सच तक न्यूजचे मनीष कश्यप यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. सुनियोजित पद्धतीने दिशाभूल करणाऱ्या, अफवा पसरवणाऱ्या पोस्ट, व्हिडिओ, टेक्स्ट मेसेज आदी टाकून दहशतीचे वातावरण निर्माण केले जात असल्याची माहिती आर्थिक गुन्हे शाखेला मिळाली होती. असे ३० व्हिडिओ आणि पोस्ट चिन्हांकित करण्यात आले. अमनकुमारकडे अनेक आक्षेपार्ह पोस्ट आणि मोबाइलमध्ये पुरावे आढळले आहेत. प्रसारित केलेले व्हिडिओ कुणाची तरी हत्या करून लटकवण्यात आल्याचे आहेत, असे चौकशीत आढळले.

बातम्या आणखी आहेत...