आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Four Bullets Fired At Shiv Sena Leader In Front Of Police In Punjab Assailant Sandeep Singh Arrested Immediately After The Incident

पंजाबात पोलिसांसमक्ष शिवसेना नेत्यावर झाडल्या चार गोळ्या:घटनेनंतर लगेच हल्लेखोर संदीप सिंह यास अटक

अमृतसर25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

पंजाबच्या अमृतसरमध्ये शिवसेनेचे टाकसाळी राष्ट्रीय अध्यक्ष सुधीर सुरी यांची शुक्रवारी १६ पोलिसांसंोर गोळ्या घालून हत्या करण्यात आली. ते गोपाल मंदिराबाहेर कचऱ्यामध्ये देवाच्या मूर्ती आढळल्याच्या विरोधात व गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी आंदोलन करत होते. घटनेच्या काही वेळानंतर पोलिसांनी हल्लेखोर संदीप सिंहला अटक केली. हल्लेखोर स्थानिक दुकानदार असून ज्या कारमधून तो आला होता त्यावर कट्टरवादी स्टिकर चिकटवलेले होते. संदीप सिंह ऊर्फ सन्नी कारमधून आला व पोलिसांसमोरच पिस्तुलातून दोन फुटांच्या अंतराने सुरींवर ४ गोळ्या झाडल्या. नंतर तो घटनास्थळसमोरील घरात जाऊन लपला. पोलिसांनी त्याला घरामागून जात पकडले. संदीपच्या वाहनाच्या काचांवर कट्टरवादी स्टिकरही लागलेले होते. तसेच वाहनात अनेक खलिस्तानी पोस्टरही सापडले. सुरींना जखमी अवस्थेत रुग्णालयात नेले, तिथे त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूची बातमी कळताच त्यांच्या समर्थकांनी संदीपच्या ४ शोरूम व कारची तोडफोड केली. आयुक्त अरुणपाल सिंह म्हणाले, गोपाल मंदिर व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षतेवरून दोन गटांत एक महिन्यापासून वाद सुरू होता.

बातम्या आणखी आहेत...