आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराक्वाड नेत्यांची पहिली बैठक शुक्रवारी पार पडली. व्हर्च्युअल बैठकीत भारताचे पंतप्रधान नरेंद्र माेदी, अमेरिकेेचे अध्यक्ष जाे बायडेन, जपानचे पंतप्रधान याेशिहिदे व आॅस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्काॅट माॅरिसन सहभागी झाले हाेते. अनौपचारिक स्थापनेच्या १४ वर्षांच्या खंडाने राष्ट्रप्रमुखांनी एकत्र येण्याची ही पहिलीच वेळ आहे. बैठकीत काेराेना लस, इंडाे-पॅसिफिक क्षेत्राची सुरक्षा, हवामान बदलासारख्या मुद्द्यांवर चर्चा झाली. अध्यक्ष झाल्यानंतर बायडेन पहिल्यांदाच मोदींसमवेत एखाद्या संमेलनात सहभागी झाले. त्यांनी व्हर्च्युअल बैठकीत पहिल्यांदाच मोदींशी संवाद साधला. आपल्या भाषणानंतर मोदींना बोलण्यासाठी निमंत्रित करताना ते मैत्रीच्या स्वरात म्हणाले, तुम्हाला बघून आनंद वाटला. त्याचबरोबर भारत लस निर्मितीचे महाकेंद्र बनल्याचेही बायडेन यांनी जाहीर केले. म्हणूनच लसीच्या चिनी नीतीला चार राष्ट्रांचा हा क्वाड गट जोरदार उत्तर देणारा ठरला आहे. आशिया-प्रशांत सागरी क्षेत्रातून जहाजांच्या वाहतुकीचा मार्ग खुला राहावा यावरही यावेळी चर्चा झाली.
२००७ मध्ये क्वाडचे काम सुरू झाले हाेते
क्वाड म्हणजेच क्वाड्रिलॅटरल सिक्युरिटी डायलाॅगची सुरुवात २००७ मध्ये जपानचे तत्कालीन पंतप्रधान शिंजाे अॅबे व पंतप्रधान मनमाेहन सिंग यांच्या कार्यकाळात झाली हाेती. सुरुवातीला चीनच्या वाढत्या प्रभावाला राेखण्यासाठी ही स्थापना झाली हाेती. मात्र तेव्हापासून या गटाचे स्वरूप व उद्देशात बदल झाला.
भास्कर एक्स्पर्ट / आर्टिफिशियल इंटेलिजन्स, तंत्रज्ञान, सुरक्षेसही अनेक महत्त्वाचे करार होणे शक्य : निवृत्त मेजर जनरल पीके चक्रवर्ती
भारताची अमेरिका, आॅस्ट्रेलिया, जपानसाेबत भागीदारी आहे. ही गाेष्ट भारताच्या विकासात मैलाचा दगड ठरू शकते. जगातील अनेक प्रकरणांत अमेरिका भारताचे सहकार्य घेत आहे, हा क्वाडचा परिणाम म्हणावा लागेल. अमेरिकेने भारताची अफगाणिस्तान प्रकरणात साथ घेतली आहे. या देशांकडून भारताला पाच पद्धतींची मदत मिळेल. पहिली- आॅस्ट्रेलियाकडून आर्टिफिशियल इंटेलिजन्सची मदत. इंटेलिजन्समध्ये आपण खूप बळकट हाेऊ. चीनचा हस्तक्षेप संपुष्टात येईल. दुसरे म्हणजे व्यापारी करार. अशा बैठकीतून भारत व्यापारी कराराच्या दिशेने पुढे जाऊ शकताे. त्यातून भारताकडे जास्त तंत्रज्ञान येणे सुकर हाेईल.
अमेरिकेकडून भारताला मुबलक टायटेनियम, हिलियम गॅस, अंतराळ क्षेत्रात सहकार्य मिळेल. आॅस्ट्रेलियातून काेळसा, युरेनियम आणि जपानकडून हाय टेक्नाॅलाॅजी माफक दरांत मिळू शकेल. तिसरे म्हणजे सायबर वाॅरमध्ये भारत चीनला मात देऊ शकेल. दूरसंचार, माेबाइल उद्याेग, अंतराळ सुरक्षा व इलेक्ट्राॅनिक गॅजेट्स, इंटरनेट इत्यादी सर्व हार्डवेअर या देशांतून स्वस्त दरात मिळेल. चीनकडून सायबर हल्ल्याचा धाेका कमी हाेईल. सध्या ५ जीमध्ये चीन सर्वात पुढे आहे. परंतु क्वाड देश आपले ५ जी किंवा ६ जी नेटवर्क बनवतील. त्यामुळे चीनचे दूरसंचारमधील अस्तित्व संपेल. चाैथी गाेष्ट म्हणजे व्हिएतनाम, दक्षिण काेरियासारखे देश मित्र आहेत. क्वाडमुळे हे संबंध आणखी बळकट हाेतील. या तीन देशांच्या मित्रराष्ट्रांशी भारताचा व्यापारी करार हाेईल. त्यातून आपल्या व्यापाराला नवी दिशा मिळेल.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.