आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Four Times The Infectious White Fungus From Black, 4 Patients Were Found, With Lungs Also Affecting The Inner Parts Of The Body.

आता 'व्हाइट फंगस'चा धोका:पाटण्यात आढळले व्हाइट फंगसचे 4 रुग्ण; हा ब्लॅक फंगसपेक्षा जास्त धोकादायक

अजय कुमार सिंह | पाटणा4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • व्हाइट फंगस शरीराच्या अनेक अवयवांना नुकसान पोहचवू शकतो

देशभरात ब्लॅक फंगस (म्यूकर मायकोसिस) झालेले अनेक रुग्ण सापडत आहेत. पण, आता या ब्लॅक फंगसनंतर व्हाइट फंगस आले आहे. बिहारमधील पाटण्यात या व्हाइट फंगसचे रुग्ण आढळल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. ब्लॅक फंगसपेक्षा जास्त धोकादायक असलेल्या या व्हाइट फंगसचे पनटामध्ये चार रुग्ण आढळले आहेत. हा व्हाइट फंगस (कँडिडोसिस) फुफ्फुसातील संक्रमणाचे मुख्य कारण आहे. फुफ्फुसासोबपतच त्वचा, नख, तोंडाच्या आतील भाग, पोट आणि आतडे, किडनी, गुप्तांग आणि मेंदुला संक्रमित करतो.

PMCH मध्ये मायक्रोबायोलॉजी विभागाचे प्रमुख डॉ. एसएन सिंह यांनी सांगितले की, आतापर्यंत अशी चार रुग्ण आढळली आहेत, ज्यांच्यात कोविड-19 ची लक्षणे होती, पण त्यांना कोरोना नसून व्हाइट फंगस होते. या रुग्णांच्या रॅपिड अँटीजन, रॅपिड अँटीबॉडी आणि आरटी-पीसीआर निगेटिव्ह आल्या होत्या. हे सर्व रुग्ण फक्त अँटी फंगल औषधांची ठीक झाले.

कोरोना आणि व्हाइट फंगस, समजणे अवघड
व्हाइट फंगसमुळे फुफ्फुसात झालेले संक्रमण एचआरसीटीमध्ये कोरोनासारखेच दिसते. त्यामुळे कोरोना आणि व्हाइट फंगसमध्ये अंतर करणे अवघड आहे. व्हाइट फंगस झालेल्या रुग्णांच्या रॅपिड अँटीजन आणि आरटी-पीसीआर निगेटिव्ह येतात. एचआरसीटीमध्ये कोरोना सारखे लक्षण दिसल्यानंतर रॅपिड अँटीबॉडी टेस्ट आणि फंगससाठी बलगमचा कल्चर करणे गरजेचे आहे. ऑक्सिजनवर असलेल्या रुग्णांना या व्हाइट फंगसचा सर्वाधिक धोका आहे. अशा रुग्णांच्या फुफ्फुसांवर हे आक्रमण करू शकते.

प्रतिकारशक्ती कमी असल्याने संक्रमण

व्हाइट फंगसची कारणे ब्लॅक फंगससारखेच आहेत. रुग्णाची प्रतिकारशक्ती कमी असणे, डायबिटीज, अँटीबायोटिकचे सेवन किंवा अनेक दिवसांपासून स्टेरॉयड घेत असलेल्या रुग्णांना व्हाइट फंगसचा धोका आहे.

नवजात बाळांना होऊ शकते संक्रमण

नवजात बाळांमध्ये हे डायपर कँडिडोसिसच्या रुपात होते. लहान बाळांमध्ये पांढरे डाग दिसतात. महिलांमध्ये हे ल्यूकोरियाचे मुख्य कारण आहे.

याच्यापासून वाचण्यासाठी काय करावे ?

ऑक्सिजनवर किंवा व्हेंटीलेटरवर असलेल्या रुग्णांच्या आसपास स्वच्छता असावी. त्यांना वापरण्यात येणारी सर्व उपकरणे योग्यरित्या सॅनिटाइज करुन घ्यावीत. ऑक्सीजन सिलेंडर ह्यूमिडिफायरमध्ये स्ट्रेलाइज पाणी वापरावे. रुग्णाच्या शरीरात जाणारे ऑक्सिजन फंगसमुक्त असावे. अशा रुग्णांच्या बलगमच्या फंगस कल्चरची तपासणी वेळोवेळी व्हावी.

बातम्या आणखी आहेत...