आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अमित शाह अॅक्शन मोडमध्ये:दिल्लीच्या परिस्थितीवर गृहमंत्र्यांची 5 दिवसात चौथी बैठक, केजरीवाल आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत चर्चा सुरू 

नवी दिल्ली10 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • शाह यांनी सोमवारी सर्वपक्षीय बैठक घेतली यापूर्वी रविवारीही केजरीवाल यांच्यासोबत चर्चा केली

दिल्लीमध्ये कोरोनाच्या परिस्थितीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि वरिष्ट अधिकाऱ्यांसोबत चर्चा सुरूआहे. कोरोना व्यवस्थापनाविषयी अमित शाह पाच दिवसांमध्ये चौथ्या वेळी बैठक घेत आहेत. 

कोरोना रुग्णांना असुविधा आणि कोरोनामुळे मरण पावणाऱ्यांचे मृतदेह कचऱ्याच्या ढिगाऱ्यात सापडल्याच्या तक्रारीनंतर सुप्रीम कोर्टाने गेल्या आठवड्यात दिल्ली सरकारला फटकारले होते. यानंतर शाह यांनी सूत्र हातात घेतली आहे. ते केजरीवाल यांच्या सीटवर बसले असल्याचे दिसत आहे. 

शेवटच्या तीन बैठका केव्हा-केव्हा झाल्या, त्यामध्ये काय झाले?

14 जून: दिल्लीचे उपराज्यपाल अनिल बैजल आणि केजरीवाल यांच्याशी शाह यांनी दीड तास चर्चा केली. आयसॉलेशन वॉर्डमध्ये रुपांतरित झालेल्या रेल्वेचे 500 डबे दिल्लीला देण्याची मंजुरी देण्यात आली. कोरोना चाचणी तिप्पट करण्याचे व खासगी रुग्णालयांमध्ये कोरोना रुग्णांसाठी रिजर्व्ह बेडमध्ये 60% कमी किंमतीत उपलब्ध करुन देण्याचा निर्णय घेण्यात आला.

14 जून: केजरीवाल यांच्या भेटीनंतर शहा यांनी त्याच संध्याकाळी दिल्लीतील सर्व महापौरांशी मनपा स्तरावरील रणनीतीवर चर्चा केले. या तीन महापौरांनी सांगितले की ते कोरोनाच्या वाढत्या परिस्थितीचा सामना करण्यास तयार आहेत आणि दिल्ली सरकारला त्या सुविधा उपलब्ध करुन देण्यास तयार आहेत.

15 जून: शाह यांनी सर्वपक्षीय बैठक घेतली. कोरोना चाचणी खर्च 50% कमी करण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला. खासगी रुग्णालयांमध्ये उपचारांचा जास्तीत जास्त दर निश्चित करण्याच्या प्रस्तावावर समिती स्थापन करण्यात आली.

अमित शाह यांनी कोरोना वॉर्डांमध्ये सीसीटीव्ही बसवण्याच्या सूचना दिल्या
सोमवारी सर्वपक्षीय बैठकीनंतर शाह अचानक एलएनजेपी रूग्णालयाची पाहणी करण्यासाठी दाखल झाले. त्यानंतर त्यांनी दिल्ली शासकीय रुग्णालयांच्या कोरोना वॉर्डात सीसीटीव्ही बसवण्यात यावेत असे निर्देश दिले.

बातम्या आणखी आहेत...