आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करालोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या नावाने बनावट व्हॉट्सअॅप अकाउंट बनवून खासदारांना मेसेज पाठवल्याची घटना समोर आली आहे. बिर्ला यांनी ट्विट करून या प्रकरणाची माहिती दिली, त्यानंतर पोलिसांनी कारवाई केली. याप्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत तीन जणांना अटक केली आहे.
लोकांना सावधगिरीचे आवाहन
लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी या घटनेबाबत ट्विट करत लोकांना सावध राहण्याचे आवाहन केले आहे. बिर्ला यांनी लिहिले - काही असामाजिक घटकांनी माझ्या नावाने व्हॉट्सअपवर बनावट खाते तयार केले आहे, ज्याचे क्रमांक 7862092008, 9480918183 आणि 9439073870 आहेत. यांच्यापासून सावध राहा.
ट्विटनंतर पोलिसांची कारवाई
ओम बिर्ला यांच्या या ट्विटनंतर ओडिशा पोलिसांनी नंबर ट्रेस करून 3 आरोपींना पकडले आहे. या आरोपींकडून 19 लाख रुपये जप्त करण्यात आले आहेत. ओडिशा पोलिस अधिकाऱ्याने माध्यमांना सांगितले की, आरोपींकडून 48 मोबाइल हँडसेट आणि सुमारे 19,000 प्री-अॅक्टिव्ह सिमकार्डदेखील सापडले आहेत. प्रत्येकाची चौकशी केली जात आहे.
टेलिकॉम प्रोव्हायडरच्या माध्यमातून सुरू होती फसवणूक
ओडिशा पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की, मुख्य आरोपी ओम बिर्ला यांचे फोटो टाकून व्हॉट्सअप अकाउंट बनवत असे. ऑनलाइन खरेदी खाते तयार करण्यासाठीदेखील ते वापरले जायचे. यानंतर तो वेगवेगळ्या टेलिकॉम प्रोव्हायडर्सच्या सहकार्याने प्री-अॅक्टिव्ह सिमकार्ड घ्यायचा. प्रत्येक व्यवहारावर तो त्यांना 400 रुपयेही द्यायचा.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.