आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराओडिशातील घटगाव येथून ऋषिकेश झारखंडची हद्द संपताच ओडिशातील कंेउझर घटगावात माता तारिणीचे मंदिर आहे. माता तारिणीला भक्त नारळ अर्पण करतात. भक्त झारखंड, आंध प्रदेश, छतीसगड, पश्चिम बंगाल किंवा देशाच्या कोणत्याही कोपऱ्यात असतील आणि बस किंवा कोणताही ट्रक ओडिशाकडे जात असेल तर चालक भक्तांचे नारळ मातेच्या दरबारापर्यंत पोहोचवतात.
आेडिशातील सर्व ३० जिल्ह्यांत नारळ गोळा करण्यासाठी १५० बॉक्स लावलेले आहेत. वाहनचालक यापैकी कोणत्याही एका बॉक्समध्ये नारळ टाकतात. तेथून ते मंदिरात पाठवले जातात. ही अनोखी कुरिअर सेवा गेल्या ६०० वर्षांपासून सुरू आहे. आधी ओडिशाकडे जाणारे घोडेस्वार भक्तांचे नारळ पोहोचवत असत. आता त्यांची जागा बस-ट्रकने घेतली आहे. श्रद्धा वाढण्यासोबतच नारळांची संख्याही वाढत गेली. मंदिर ट्रस्टचे अधिकारी संजीव महापात्रा सांगतात, आता मंदिरात रोज ३० हजारांहून अधिक नारळ येतात. म्हणजे वर्षभरात सुमारे १ कोटी. या नारळांपासून मंदिराला दरमहा ३.५ कोटींची कमाई होते. सुमारे १.५५ लाख चौरस किमी परिसरातील या मंदिरात नारळ पाठवण्याची परंपरा १४व्या शतकापासून सुरू आहे. श्रद्धेच्या धाग्यात गुंफलेली अशी सेवा जगात शक्यतो कुठेच पाहायला मिळणार नाही. आेडिशा आणि झारखंडमध्ये माता तारिणीदेवीची सुमारे १०० छाेटी-मोठी मंदिरे आहेत, पण या मंदिराची गोष्टच वेगळी आहे. रांची असो वा काेलकाता, रस्तेमार्गे अोडिशाला जात असाल तर जागोजागी लाल कपड्यांत नारळ बांधलेले भक्त दिसतील. प्रत्येक ठिकाणी चालक त्यांच्याकडून नारळ घेताना दिसतात. मंदिर ट्रस्टकडून अोडिशातील गंजम, मयूरभंज, मलकानगिरी, संबलपूरसह ३० जिल्ह्यांत बसस्थानक व चौकांमध्ये कलेक्शन बॉक्स ठेवले आहेत. यात नवसाचे नारळ टाकले जातात. बाॅक्समधून काढून नारळ ट्रकद्वारे तारिणी मंदिरात पाठवले जातात.
केंउझरचे तत्कालीन शासक गोविंदा भंजदेव यांनी तारिणी मातेची १४८० मध्ये स्थापना केल्याची आख्यायिका आहे. कांची युद्धावेळी ही देवी राजा पुरीहून कंेउझरला आणत होते, पण तिने मागे वळून पाहिले तर माता पुढे जाणार नाही, अशी अट होती. घटगाव जंगलात राजाला वाटले की, माता तारिणी येत नाही. त्यांनी वळून पाहिले तर तारिणी तिथेच थांबली. यानंतर राजाने त्याच ठिकाणी मातेची पूजा केली आणि याच स्थानाचे शक्तिपीठात रूपांतर झाले. इथे कलिंग स्थापत्य शैलीत मंदिराचे बांधकाम केले आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.