आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Freedom Of The Press Declined In 80% Of The World's Countries, With 47 Journalists Killed Last Year

आज वर्ल्ड प्रेस फ्रीडम डे:जगातील 80 % देशांमध्ये वृत्तपत्र स्वातंत्र्य घटले, गेल्या वर्षी 47 पत्रकारांचा मृत्यू

औरंगाबाद13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जगात वृत्तपत्र स्वातंत्र्याची सातत्याने दडपशाही केली जात आहे. गेल्या वर्षी आपले काम करत असताना ४७ पत्रकारांचा मृत्यू झाला, ३५० पेक्षा जास्त जणांना जेलमध्ये टाकले. २०१५ ते २०२१ दरम्यान ४५५ पत्रकारांचा कामादरम्यान मृत्यू झाला. जाणून घेऊया पत्रकारांपुढील आव्हानांबाबत....

रिपोर्टर सेन्स फ्रीडम रँकिंगमध्ये भारत १८० देशांच्या यादीत १४२व्या स्थानी आहे. इतका कमी रँक दिल्याबद्दल भारत सरकारने प्रश्न उपस्थित केले. यात पहिले नाव नाॅर्वेचे, तर दुसऱ्या स्थानी फिनलंड आणि तिसऱ्या स्थानी डेन्मार्क आहे. १८० देशांच्या यादीत सर्वात शेवटी पर इरिट्रिया आहे. १७९व्या स्थानी उत्तर कोरिया आहे.

ऑनलाइनही धोका
युनेस्को आणि इंटरनॅशनल सेंटर फॉर जर्नलिस्ट्सच्या मते, महिला पत्रकारांची स्थितीही दयनीय आहे.

वृत्तपत्र स्वातंत्र्य... भारताचा क्रमांक १४२वा, उत्तर कोरिया सर्वात खाली

पत्रकारांसाठी मेक्सिको सर्वात धोकादायक
पत्रकारांसाठी मेक्सिको देश सर्वात धोकादायक आहे. रिपोर्ट‌्स विदाउट बॉर्डर्सच्या मते, मेक्सिकोत ५ वर्षांत ४७ पत्रकारांची हत्या झाली. चीनमध्ये पत्रकारांना सातत्याने कारागृहात डांबले जात आहे.

25% ना शारीरिक इजा पोहोचवण्याची धमकी मिळाली. 18% म्हणाले, लैंगिक शोषणाची धमकी मिळाली. महामारीत पत्रकारांच्या अडचणी जास्त होत्या, परंतु कामाच्या बाबतीत वचनबद्धता वाढली 61% नी पत्रकारितेबद्दल वचनबद्धता वाढल्याचे सांगितले, लोकांचा वृत्तपत्रांकडे कल वाढला 43% लोक म्हणाले, कोरोनात पत्रकारितेवर लोकांचा विश्वास वाढल्याची जाणीव झाली. 20% देशांमध्ये वृत्तपत्र स्वातंत्र्यावर अंकुश लागलेला नाही. 40% पत्रकार मानतात की, त्यांच्या देशामध्ये वृत्तपत्र स्वातंत्र्य घटत आहे. 45% नी आगामी ३ वर्षांत वृत्तपत्र स्वातंत्र्य घटण्याची शक्यता वर्तवली. 73% म्हणाले, आम्हाला कामाच्या वेळी ऑनलाइन हिंसाचार सहन करावा लागला.

बातम्या आणखी आहेत...