आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • FriendShip Day Special : Sachin Tendulkar Vinod Kambli, Anand Mahindra And Uday Kotak And Sanjay Dutt Rajkumar Hirani

मैत्रीचे 4 किस्से:कोणत्याही परिस्थितीत मित्रच मित्राच्या कामी येतो, सचिन तेंडुलकर-विनोद कांबळी, संजय दत्त-राजकुमार हिरानी आणि किरण मजूमदार आहेत उत्तम उदाहरण

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • सचिन-कांबळी यांच्या मैत्रीचा परिणाम असा झाला की या दोघांनी 1988 मध्ये शालेय क्रिकेटमध्ये 664 धावा केल्या ज्याचा गिनीज बुक ऑफ रेकॉर्डमध्ये समावेश करण्यात आला
  • राजकुमार हिरानी यांच्यावर संजय दत्तची प्रतिमा बदलण्याचे आरोप लावण्यात आले तेव्हा त्यांनी स्वीकार केले की, मी संजू चित्रपटात असे सीन टाकले, जे त्याच्याप्रति साहानुभूति निर्माण करतील

मैत्रीचे देखिल एक शास्त्र आहे. जे म्हणते की, आपल्याला दीर्घ आयुष्य हवे असेल तर मित्रांची संख्या वाढवा. अमेरिकेच्या ब्रिघॅम यंग युनिव्हर्सिटीच्या संशोधनात असे म्हटले आहे की लठ्ठपणापेक्षा मित्र नसणे अधिक धोकादायक आहे, यामुळे जीवनाचा धोका वाढतो. आपले लोक दूर गेले तरीही जो आपल्याला एकटे सोडत नाही तो सर्वात चांगला मित्र आहे.

आज फ्रेंडशिप डे आहे, जाणून घ्या मैत्री असेच 4 प्रसिद्ध किस्से, जे खरोखर मैत्री शब्दाचा अर्थ स्पष्ट करतात आणि शिकवतात की जगाने जरी साथ सोडली तरी खरा मित्र कधीही सोबत सोडत नाही.

सचिन तेंडुलकर-विनोद कांबळी : धावा काढण्याची आणि वडा पाव खाण्याची भूक संपत नव्हती

भारतीय क्रिकेट विश्वातील सर्वात चर्चित मित्र म्हणजे सचिन आणि विनोद कांबळी आहे. त्यांना मुंबई क्रिकेटचे 'जय-वीरू' म्हणूनही ओळखले जाते. जेव्हा सचिनचे वय 9 वर्षे आणि विनोदचे वय 10 वर्षे होते तेव्हा यांची भेट झाली. मुंबईच्या शारदा श्रम स्कूलमध्ये हे दोघं भेटले. येथे शिक्षण, मजा, मस्ती आणि शिक्षा हे सर्व या दोघांनी एकत्रच एन्जॉय केलं.

क्रिकेटही हे दोघं सोबतच खेळत होते. दोघांच्या घट्ट मैत्रीचा परिणाम म्हणजे 1988 मध्ये दोघांनी वर्ल्ड रेकॉर्ड बनवला. दोघांनी मिळून शालेय क्रिकेटमध्ये 664 धावा काढल्या. ज्याची गिनीज बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद झाली. या घटनेनंतर ते दोघंही लाइमलाइटमध्ये आले. काही वर्षांनंतर ते दोघंही भारतीय क्रिकेट संघात सामिल झाले.

विनोद कांबळीनुसार, कँटीनमध्ये दोघांचा आवडता पदार्थ वडापाव होता. कोण किती वडापाव खाऊ शकतो याची पैज ते लावत असतं. सचिनने 100 रन काढल्यानंतर विनोद त्याला 10 वडा पाव खाऊ घालत असतं. तसंच सचिनही विनोदसाठी करायचा. शाळेत भाषण देण्याची बारी आल्यानंतर चालाखीने विनोद सचिनला मागे सोडून देत होता.

एक किस्सा आहे, जेव्हा सचिनला स्पीच द्यायचे होते. सचिनचे भाषण केवळ दोन मिनिटांचे होते. मात्र कांबळीने इंग्रजीच्या टीचरकडून भाषण लिहून घेतले आणि ते मंचावर ते वाचून सचिनला आश्चर्यचकित केले. ही मैत्री अशीच पुढे वाढत गेली आणि मुंबईच्या वानखेडे स्टेडियमपर्यंत पोहोचली.

दोघांची मेहनत फळास आली आणि दोघही क्रिकेट जगतातील स्टार झाले. मात्र याच काळात दोघांमध्ये प्रेमळ भांडणही झाले. कोणात किती ताकद आहे या कारणामुळे भांडण झाले. स्टेडियमच्या विठ्ठल स्टँडच्या चौथ्या रांगेत त्यांचे भांडण झाले. त्यांनी मारामारी करण्यास सुरुवात केली मात्र सचिनला खूश करण्यासाठी कांबळी मुद्दामून जमिनीवर पडला.

कांबळीने एका मुलाखतीत सांगितले, मला हरवण्यात सचिनला खूप आनंद मिळायचा. मग ते क्रिकेटचे मैदान असो किंवा शाळेत ताकद दाखवण्याची सवय. सचिन माझ्यापेक्षा लहान होता. मला त्याला निराश करायचे नव्हते. कांबळीने सांगितल्याप्रमाणे सचिनला नेहमीच पंजा लढवून ताकद दाखवण्याचा शौक होता. दोघांनी 14-15 वर्षांचे असताना 1987 वर्ल्डकपमध्ये बॉल बॉय क्रिकेटची जोडले गेले.

इंग्लंड आणि भारतामध्ये मॅच होती. यावेळी दोघांनी स्वप्न पाहिले की, वर्ल्ड कप आपण एकत्र मिळून खेळू आणि असेच झाले. 1992 मध्ये ते वर्ल्ड कप खेळले. आतापर्यंतच्या काळात दोघांची मैत्री तुटल्याच्या अनेक बातम्या आल्या मात्र दोघंही यावर नेहमी शांत राहिले आणि कधीच एकमेकांचा विरोध केला नाही.

संजय दत्त - राजकुमार हिरानी : मैत्री जगासमोर दाखवली नाही, मात्र नेहमी जपली

मित्राची बिघडलेली प्रतिमा सुधारण्यासाठी आणि त्याला पटरीवर आणण्याचे काम मित्र योग्य प्रकारे करु शकतो. फिल्ममेकर राजकुमार हिरानी आणि अभिनेता संजय दत्तची मैत्रीही याच पटरीवरुन पुढे जाते. संजू चित्रपट आल्यानंतर राजकुमार हिरानीवर संजय दत्तची बिघडलेली प्रतिमा बदलण्याचा आरोप लावण्यात आला.

असं तर संजय आणि राजकुमार हिरानीने कधीच आपली मैत्री खुलून स्वीकारली नाही. मात्र संजू चित्रपटात प्रतिमा बदलल्याचा आरोप लावल्यानंतर अखेर हिराने स्वीकार केले की, त्यांनी चित्रपटात असे अनेक सीन टाकले आहेत, जे संजय प्रति लोकांच्या मनात सहानुभूती निर्माण करतील.

राजकुमार आणि संजयची पहिली भेट 2003 मध्ये झाली. हिरानी फिल्म मुन्नाभाई एमबीबीएससाठी जिम्मी शेरगिलच्या रोलमध्ये संजय दत्तला घ्यायचे होते आणि मुन्नाभाईसाठी शहारुख पहिली पसंद होती. मात्र हे होऊ शकले नाही आणि अखेर संजयने मुन्नाभाईची भूमिका साकारली. दोघांची मैत्री वाढत गेली आणि संजयची पत्नी मान्यताने सांगितल्यानुसार हिरानीने संजूची बायोपिक तयार करण्यास सुरूवात केली.

राजकुमार हिरानींनुसार जेव्हा चित्रपटाचा एक भाग तयार झाला. तेव्हा पहिले अशा लोकांना दाखवण्यात आला जे संजय दत्तचा तिरस्कार करत होते. तेव्हा लोकांचे उत्तर होते की, आम्ही या व्यक्तीचा तिरस्कार करतो आणि असा चित्रपट पाहायची इच्छा नाही. यानंतर चित्रपटात काही बदल करण्यात आले आणि यामध्ये काही असे सीन टाकण्यात आले जे संजय दत्तची प्रतिमा सुधारतील.

आनंद महिंद्रा आणि उदय कोटक : मित्रच नाही तर मेंटर आणि गाइडही

बिझनेसमन उदय कोटक, आनंद-महिंद्राला केवळ मित्र नाही तर मेंटर आणि गाइडही मानतात. उदय कोटक यांच्या लग्नाच्या वेळी त्यांच्या मैत्रीची सुरुवात झाली. लग्नात आलेल्या पाहुण्यांमध्ये आनंद महिंद्राही होते. आनंद विदेशातून शिक्षण घेऊन तेव्हाच परतले होते आणि महिंद्रा अँड महिंद्रा समूहची कंपनी महिंद्रा स्टीलचा कारभार पाहत होते. ही स्टील कंपनी कोटकची क्लाइंट होती.

बोलता बोलता कोटकच्या व्यापारातील गुंतवणुकीविषयी बोलणे झाले आणि 30 लाख रुपयांच्या सुरुवातीच्या इक्विटी कॅपिटलसह नवीन कंपनीची सुरुवात करण्याचे ठरले. आनंदचे वडीलही उदयच्या कंपनीचे चेअरमन बनण्यास तयार झाले. जेव्हा आनंदची एंट्री बोर्ड मेंबर्समध्ये झाली, तेव्हा कंपनीला कोटक महिंद्रा असे नाव देण्यात आले. अशा प्रकारे कोटक महिंद्रा फायन्सेंची सुरुवात झाली.

महिंद्रासोबत जोडले गेल्याने कंपनीची विश्वासार्हकात जास्त वाढली. नंतर 2009 मध्ये आनंद महिंद्रा यांनी स्वतःला या कंपनीपासून वेगळे केले. मात्र महिंद्रा नाव आजही कंपनीशी जोडलेले आहे. 2017 मध्ये कोटक-महिंद्रा बँकची एक स्कीम लॉन्चिंगवर कोटक महिंद्रा ग्रुपचे एग्जीक्यूटिव्ह व्हाइस चेअरपर्सन आणि मॅनेजिंग डायरेक्टर उदय कोटक यांनी ही गोष्ट शेअर केली होती.

याविषयी आनंद यांनीही ट्विट केले होते, ज्यामध्ये लिहिले होते की, '1985 मध्ये युवा उदय कोटक माझ्या ऑफिसमध्ये आले होते, ते खूप स्मार्ट होते आणि मी विचारले की, मी त्यांच्या कंपनीमध्ये गुंतवणूक करु शकतो का, हा माझा सर्वात चांगला निर्णय होता. याचे उत्तर देताना उदय कोटक म्हणाले होते , 'धन्यवाद आनंद, या पूर्ण प्रवासात तुम्ही माझे मित्र, मेंटर आणि मार्गदर्शक राहिला आहात'

किरण मजूमदार शॉ : जेव्हा पती आणि मैत्रिणीच्या आयुष्याचा प्रश्न आला, तेव्हा दोन्ही कर्तव्ये पार पाडली

मैत्रीचा एक चांगला किस्सा बायोकॉनचे व्यवस्थापकीय संचालक किरण मजुमदार शॉशी देखील संबंधित आहे. आयुष्यात एक वेळ अशी होती जेव्हा पती आणि मित्र दोघेही कर्करोगाशी झगडत होते, परंतु त्यांनी व्यवसाय, कुटुंब आणि मैत्री दरम्यान तिन्ही जबाबदाऱ्या चांगल्या प्रकारे पार पाडल्या आणि इतरांच्या मदतीचा मार्गही सोपा केला. किरण यांच्या सर्वात जवळची मैत्रिण नीलिमा रोशन यांना 2002 मध्ये कर्करोगाचे निदान झाले होते.

आर्थिकदृष्ट्या श्रीमंत कुटुंबातील असूनही बहुतांक औषधी बाहेरून येत असल्याने नीलिमा यांना पैशांची अत्यंत कमतरता भासू लागली होती. अशात किरण त्यांच्यासोबत उभ्या राहिल्या आणि आर्थिक मदत केली. किरण यांना मैत्रिणीच्या आजाराच्या तणावातून मुक्त होण्यापूर्वीच आणखी एका बातमीने धक्का दिला होता.

किरण यांचे पती जॉन शॉ यांना देखील कर्करोग झाल्याचे 2007 मध्ये समजले. दोन्ही घटनांमुळे किरण यांना इतका त्रास झाला की भविष्यात इतरांच्या बाबतीत असे होऊ नये यावर त्यांना विचार करायला भाग पाडले. किरण व नारायण हृदयालयाच्या देवी शेट्टी यांच्यासमवेत बंगळुरूमध्ये 2007 मध्ये मजूमदार-शॉ कर्करोग रुग्णालय सुरू केले. येथे अगदी कमी किमतीत कर्करोगावर उपचार केला जातो.

कित्येक महिन्यांच्या उपचारानंतर पती कर्करोगमुक्त झाल्याची बातमी मिळाली. किरण यांच्यानुसार, जेव्हा डॉक्टरांनी जॉन पूर्णपणे ठीक झाल्याचे ऐकले, तेव्हा मी हा आनंद शब्दांत व्यक्त करू शकले नाही. किरण मैत्रिणीच्या उपचारादरम्यान तिच्यासोबत बराच वेळ घालवला. तिच्यासोबत फिरायला देखील गेली. जेणेकरून तिला चांगले वाटेल.

कित्येक प्रत्येक विकेंडला मैत्रिणीला भेटण्यासाठी हैदराबादहून येत होती, तिला सरप्राइज पार्टी द्यायची. कामात व्यस्त असूनही तिच्यासोबत वेळ घालवायची. पण एके दिवशी नीलिमाने जगाचा निरोप घेतला आणि ही मैत्री शेवटपर्यंत कायम राहिली.

बातम्या आणखी आहेत...