आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकाश्मीरमध्ये पर्यटनात वाढ आणि हिंसाचाराच्या घटनांत घट झाल्याचे आकडे येत असतानाच दहशतवाद्यांनी पुन्हा डोके वर काढण्याचा प्रयत्न केला आहे. २४ तासांत २ हत्या करून त्यांनी सुरक्षा यंत्रणेला आव्हान दिले आहे. पहिली हत्या गुरुवारी राहुल भट नावाच्या काश्मिरी पंडिताची झाली. नंतर शुक्रवारी एका कॉन्स्टेबलला घरात घुसून मारले. राहुल यांच्या हत्येच्या विरोधात काश्मिरी पंडित एकाच वेळी अनेक शहरांत रस्त्यांवर उतरले. बडगामच्या शेखपोरा ट्रान्झिट कॅम्पच्या बाहेर एकत्र आलेल्या पंडितांवर पोलिसांनी लाठीमार केला तसेच अश्रुधूर सोडला. प्रशासनात काम करणाऱ्या पंडित कर्मचाऱ्यांचा एक मोठा समूह नायब राज्यपाल मनोज सिन्हा यांना भेटण्यासाठी विमानतळ रस्त्याकडे निघाला होता. शुक्रवारी काश्मिरी पंडितांनी शासकीय कार्यालयांवर बहिष्कारही टाकला. दुसरीकडे, सुरक्षा दलांनी एका चकमकीत तीन दहशतवाद्यांना ठार मारले. त्यापैकी दोघे राहुल भट यांच्या हत्येत सहभागी होते. दरम्यान, सरकारने राहुल यांच्या पत्नीला सरकारी नोकरी देण्याची आणि मुलीच्या शिक्षणाचा खर्च करण्याची घोषणा केली आहे.
राहुल यांच्या अंत्यसंस्कारानंतर भाजप नेत्यांना घेराव
जम्मू | काश्मिरी पंडित राहुल भट यांचे पार्थिव सकाळी जम्मूत पोहोचले. त्यांच्या अंत्यसंस्कारानंतर लोकांनी आक्रोश केला. यादरम्यान, जम्मूत भाजप नेत्यांना काश्मिरी समुदायाच्या लोकांनी घेरले. भाजप शाखेचे प्रमुख रविंदर रैना आणि माजी उपमुख्यमंत्री कविंदर गुप्तांसह भाजप नेत्यांना विरोधाचा सामना करावा लागला. काश्मिरी पंडितांनी आम्ही कधीपर्यंत बळीचे बकरे बनत राहू, या आशयाच्या घोषणा दिल्या.
अतिरेक्यांचे मनोधैर्य खच्ची, त्यामुळे होताहेत नागरिकांवर हल्ले
-जाणकारांनुसार, अतिरेक्यांनी पद्धत बदलली आहे. प्रथम ते सुरक्षा जवानांवर निशाणा साधत होते. आता ते जवानांशी सामना करत नाहीत. नवा अतिरेकी ३ महिन्यांहून अधिक काळ जिवंत राहू शकत नाही. खोऱ्यात लाखो बिगर मुस्लिम आहेत. प्रत्येक व्यक्तीला सुरक्षा दिली जाऊ शकत नाही.
-अतिरेक्यांकडे शस्त्रांची कमतरता आहे. एका नागरिकावर निशाणा साधण्यासाठी एक पिस्तूल आणि एका गोळीची गरज असते. मात्र, यामुळे दहशत जास्त पसरते.
-एका वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यानुसार, काश्मीरमध्ये सध्या केवळ १७५ अतिरेकी आहेत. वर्षात अशी एखादी घटना झाली तरी वातावरण खराब करण्यासाठी ती पुरेशी आहे.
-सध्या अमरनाथ यात्रा सुरू आहे, त्यात ८ लाख भाविक येण्याची शक्यता आहे. त्यामुळे वातावरण बिघडत राहावे,अशी अतिरेक्यांची इच्छा आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.