आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
 • Marathi News
 • National
 • From April 15 To May, 12 Dates But Marriages Are Cancelled; Pressure Will Be On 3 Dates In June

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

लग्नांवर कोरोनाचे संकट:15 एप्रिलपासून ते मेपर्यंत 12 मुहूर्त, पण विवाह टळत आहेत; जूनमध्ये 3 मुहूर्तांवर असेल दबाव, नंतर मार्चपर्यंत केवळ 6 मुहूर्त 

उज्जैनएका वर्षापूर्वीलेखक: प्रतिनिधी
 • कॉपी लिंक
 • जुलै ते 24 नोव्हेंबरपर्यंत कोणतेच मुहूर्त नाहीत, नोव्हेंबर डिसेंबरमध्ये दोन-दोनच मुहूर्त

कोरोना व्हयर्सचा परिणाम वैवाहिक आयाेजनानावरही पडत आहे. एप्रिलमध्ये 15 तारखेपासून विवाह मुहूर्तांना सुरुवात होत आहेत आणि या महिन्यात एकूण पाच मुहूर्त आहेत, पण लॉकडाउनमुळे ना केवळ एप्रिल तर मीपर्यंतची आयोजनेदेखील रद्द होत आहेत. तसे तर यावर्षी लग्नाचे मुहूर्त कमी आहेत. सर्वात जास्त 12 मुहूर्त एप्रिल आणि मेमध्ये आहेत. कडक लॉकडाउन आणि सोशल डिस्टंसिंगमुळे लोक मेबद्दलही साशंक आहेत. यामुळे जूनमध्ये लग्नाची घाई असेल. मात्र जूनमध्ये केवळ 3 मुहूर्त आहेत. त्यानंतर पुढच्यावर्षी मार्च पर्यंत 6 शुभ तिथी आहेत. पंडित, हॉटेल आणि मॅरेज गार्डन संचालक आणि कॅटरर्सचे म्हणणे आहे की, लग्नाच्या अय सीजनमध्ये यावर्षी व्यवसाय ठप्प झाला आहे. 

जुलै ते 24 नोव्हेंबरपर्यंत कोणतेच मुहूर्त नाहीत, नोव्हेंबर डिसेंबरमध्ये दोन-दोनच मुहूर्त आहेत...  

 • 2020 : विवाह मुहूर्त
 • एप्रिल : 15, 20, 25, 26, 27
 • मे : 1, 2, 4, 6, 17, 18, 19
 • जून : 13, 15, 30 तारीख

1 जुलै ते 24 नोव्हेंबरपर्यंत शुभ मुहूर्त नाही... 

 • नोव्हेंबर : 25, 30
 • डिसेंबर : 7, 9

2021 : जानेवारी, मार्चमध्ये मुहूर्त नाहीत... 

 • जानेवारी : कोणताच मुहूर्त नाही
 • फेब्रुवारी : 15, 16
 • मार्च : एकही मुहूर्त नाही

यावर्षी केव्हा केव्हा लग्नाचे मुहूर्त नाहीत... 

 • 29 मे ते 12 जूनपर्यंत शुक्र अस्त, विवाह होणार नाहीत
 • 1 जुलैला देवशयनी एकादशीपासून 24 नोव्हेंबरपर्यंत
 • 15 डिसेंबरपासून 14 जानेवारी 21 पर्यंत धनु संक्रांतीमुळे
 • 19 जानेवारीपासून 11 फेब्रुवारी 21 पर्यंत गुरु अस्त होण्यामुळे
 • 21 फेब्रुवारी ते 12 एप्रिल 2021 पर्यंत शुक्र अस्त होण्यामुळे

3.80 लाख कोटी रुपयांचा आहे वार्षिक बाजार... 

भारतात लग्नाचा बाजार 3.80 लाख कोटी रुपयांचा आहे, जो दरवर्षी वेगाने वाढत आहे. 130 कोटींची लोकसंख्या असलेल्या देशात दरवर्षी 1-1.2 कोटी लग्न होतात. 

पंडित म्हणाले - चांगले सीजन पूर्णपणे खराब झाले... 

पंडित श्याम नारायण व्यास यांचे म्हणणे आहे की, एप्रिल, मे आणि जूनचे 45 विवाह बुक होते. लॉकडाउनमुळे सर्व रद्द झाले. संपूर्ण सीजन खराब झाले आहे. 

बातम्या आणखी आहेत...