आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • From Chaitra Navratri, Vaishnodevi Shrine Is Free From Restrictions, Like Katra Navri To Welcome Devotees; Reached 12.50 Lakh People In 3 Months |marathi News

दर्शन:चैत्र नवरात्रीपासून वैष्णोदेवी तीर्थ निर्बंधमुक्त, भाविकांच्या स्वागतासाठी कटरा नवरीसारखे नटले; 3 महिन्यांत 12.50 लाख लोक पोहोचले

कटरा (जम्मू)4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

माता वैष्णोदेवीचा बेस कँप कटरापासून ते दरबारापर्यंत उत्साह आहे. चैत्र नवरात्रीनिमित्त देश-विदेशातून आलेले ऑर्किड, लिलीसह शेकडो प्रकारची रंगीबेरंगी फुलांनी यात्रा मार्ग सुगंधित झाला आहे. रात्री रंगीबेरंगी प्रकाशात न्हालेला मंदिर परिसर स्वर्गाचा अनुभव देत आहे. त्यासाठी सुमारे ३०० फ्लॉवर डेकोरेटर्सनी अनेक आठवडे रात्रंदिवस श्रम घेतले. या वेळी तर भाविकांच्या ये-जा करण्यावर कोणतेच निर्बंध नाहीत. चैत्र नवरात्र सुरू होण्यापूर्वीच गुहा मंदिरात रोज २५ हजार लोक येत आहेत. वर्षाच्या प्रारंभीच्या तीन महिन्यांतच १२.५० लाख लोक पोहोचले. श्राइन बोर्डाच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, ‘निर्बंध संपुष्टात आल्यानंतर रोज ४० हजार भाविक पोहोचतील, अशी आम्हाला आशा आहे.’

या वेळी भाविकांच्या स्वागतासाठी येथील रहिवाशांनी संपूर्ण कटरा शहर नवरीसारखे नटवले आहे. कटरातील व्यापारी, विशेषत: ड्रायफ्रूट विक्रेते गर्दी पाहून खूप आनंदी आहेत. येथे सुक्यामेव्याची सुमारे ४०० दुकाने आहेत. भाविक दर्शनानंतर प्रसाद म्हणून ड्रायफ्रूट खरेदी करतात. विक्रेता गौरव खजूरिया म्हणाले, दोन वर्षांत पहिल्यांदाच आम्ही एवढी गर्दी बघत आहोत. विक्रीही पूर्वीप्रमाणेच होत आहे. या वेळी माता आमचे नुकसान भरून काढेल, अशी आम्हाला आशा आहे. गुहा मंदिरात सकाळ-संध्याकाळची आरती, विशेष पूजेशिवाय भजन संध्याही होईल. आजवर अनुराधा पौडवाल, गुरदास मान, सोनू निगम, सुखविंदर सिंह, लखविंदर वडालीसारख्या कलाकारांनी सादरीकरण केले. दुसरीकडे मागील चुकांपासून धडा घेत श्राइन बोर्डाने गुहा मंदिरात गर्दी व्यवस्थापनाचा निर्णय घेतला आहे.

निर्बंधांमुळे २०२०-२१मध्ये प्रसाद, दानातून ६७ कोटी रु. आले. ते २०१९-२० च्या तुलनेत १०० कोटी कमी होते. दरम्यान, श्राइन बोर्डाला विविध स्रोतांद्वारे २२०.३३ कोटींचे उत्पन्न झाले. तर बोर्डाने विविध प्रकल्पांवर २४४.५४ कोटी खर्च केले. दुसरीकडे श्राइन बोर्डाने २०१९-२०२० मध्ये एकूण ४४२. ८६ कोटींचे उत्पन्न मिळवले होते. तर ३९६.९५ कोटी रुपये खर्च केले होते. भाविकांची संख्या वाढल्याने मंदिराचे उत्पन्नही वाढेल अशी अपेक्षा आहे.

बातम्या आणखी आहेत...