आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • From Coffers To Factories... Auspicious Gains, 1.40 Lakh Crore For The Seventh Time This Year. More Than

जीएसटी संकलन:तिजाेरीपासून कारखान्यांपर्यंत... शुभ लाभ, या वर्षी सातव्यांदा 1.40 लाख कोटी रु. पेक्षा जास्त

नवी दिल्लीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

देशात ऑगस्ट महिन्यात जीएसटी संकलन १,४३,६१२ कोटी रुपये झाले. ते गेल्या वर्षाच्या ऑगस्ट महिन्याच्या तुलनेत २८% जास्त आहे. विशेष म्हणजे या वर्षी जानेवारीपासून आतापर्यंत ८ पैकी ७ महिन्यांत जीएसटी संकलन १.४० लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त राहिले, हाही एक विक्रम आहे. अर्थ मंत्रालयाने गुरुवारी जीएसटी संकलनाचे आकडे जारी करत म्हटले की, आर्थिक सुधारणांसोबतच उत्कृष्ट जीएसटी संकलनामुळे महसुलात सकारात्मक वाढ झाली आहे. तज्ज्ञांच्या मते, जीएसटी संकलन सलग १.४० लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त राहणे हे भारतीय अर्थव्यवस्थेत आलेल्या वेगाचे निदर्शक आहे.

क्रिसिलचे मुख्य अर्थतज्ज्ञ डी. के. जोशी यांनी सांगितले की, जीएसटी संकलनात सलग वाढीची ४ प्रमुख कारणे आहेत. पहिले- भारतीय अर्थव्यवस्थेला वेग आलेला आहे. दुसरे- बाजारात मागणी सतत वाढ झाली आहे, त्यामुळे व्यावसायिक घडामोडी वाढल्या आहेत. तिसरे- महागाईही वाढलेली आहे. चौथे- सरकारच्या कठोर भूमिकेमुळे जीएसटीची चोरी कमी झाली आहे.

पुढे काय? जीएसटी संकलन सध्या सतत वाढत राहील डी. के. जोशी यांच्या मते, आर्थिक परिस्थिती सुधारली आहे. आता सणासुदीच्या हंगामात विक्रीत वाढ होणे निश्चित आहे. त्यामुळे जीएसटी संकलन वाढत राहील. पण महागाई कमी झाली तर त्याचा काही नकारात्मक परिणाम जीएसटी संकलनावर पडू शकतो.

बातम्या आणखी आहेत...